Soybean  Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Crop Destroy : मूर्तीजापूर तालुक्यात सोयाबीनवर फिरवला रोटाव्हेटर

Team Agrowon

Akola News : सोयाबीन पिकाला शेंगा लागलेल्या नसल्याने मूर्तीजापूर तालुक्यातील जितापूर खेडकर, ब्रह्मी या भागात काही शेतकऱ्यांनी पिकावर रोटाव्हेटर फिरवला आहे. पीक नुकसानसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मूर्तीजापूर तालुक्यातील जितापूर खेडकर, ब्रम्ही या भागांत खऱीप हंगामात सोयाबीनची मोठ्या क्षेत्रावर पेरणी झाली होती. काही भागात पीक सोंगणीसाठी तयार होत असताना या गावशिवारात अनेकांच्या सोयाबीन पिकात शेंगाच लागलेल्या नाहीत.

पीक येण्याची शक्यता दिसत नसल्याने शेतकरी पिकात रोटाव्हेटर फिरवत आहेत. मोठ्या मेहनतीने शेती तयार करून महागडे बियाणे, खते, फवारण्या करीत सोयाबीनच्या पिकाचे व्यवस्थापन केले होते.

परंतु अतिवृष्टी, कीडरोगांमुळे सोयाबीनच्या झाडावर शेंगाच लागल्या नाहीत. त्यामुळे सोयाबीन पिकासाठी आतापर्यंत केलेला एकरी सुमारे १५ हजारांचा खर्च वाया गेला आहे.

शासनाने एकरी २० हजारांची मदत देऊन पीकविमा देण्यास विमा कंपनीस निर्देश द्यावेत, अशी मागणी संकटग्रस्त शेतकरी धम्मानंद तायडे, रामभाऊ तायडे, राजू डोंगरे, धम्मापल डोंगरे, रणजित डोंगरे, गजानन घोडेस्वार, जनमंच, प्रगती शेतकरी मंडळाचे प्रमोद खेडकर यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कांदा भावात नरमाई; कापूस, सोयाबीन, डाळिंब तसेच काय आहेत आले दर ?

Strawberry Nurseries Rain Damage : पावसाने स्ट्रॉबेरी रोपवाटिकांचे नुकसान, लागवडी रखडल्याने शेतकरी चिंतेत

Illegal Tap Connection : बेकायदा नळजोडणीचे कनेक्शन घट्ट

Solar Power : भांडूप परिमंडळात सौरऊर्जेला अधिक पसंती

Onion Rate : ठाण्यात उत्तम दर्जाचा कांदा अर्ध्या किमतीत

SCROLL FOR NEXT