MGNREGA Agrowon
ॲग्रो विशेष

MGNREGA Wages: ‘रोहयो’च्या मजुरीत पाच वर्षांत केवळ दहा ते चोवीस रुपयांची वाढ

Rural Employment Scheme: रोजगार हमी योजनेत (रोहयो) मजुरांच्या मजुरीत गेल्या पाच वर्षांत केवळ 10 ते 24 इतकीच किरकोळ वाढ झाली आहे. वाढत्या महागाईच्या तुलनेत ही वाढ अपुरी ठरत असून, यंदा एप्रिलमध्ये मजुरीचा दर ₹400 करण्यात यावा, अशी कामगार संघटनांची मागणी आहे.

Team Agrowon

Amravati News: रोजगार हमी योजनेत (रोहियो) काम करणाऱ्या मजुरांच्या मजुरी दरात गेल्या पाच वर्षांत केवळ दहा ते चोवीस रुपयांची वाढ झाली आहे. वाढत्या महागाईचा दर बघता मजुरांना मिळणारी ही मजुरी परवडेनाशी झाली आहे. एक एप्रिलला मजुरीचे नवे दर केंद्राकडून जाहीर होतात. गेल्या पाच वर्षांतील दरवाढीचा आलेख बघता यंदा आशादायक चित्र दिसेल का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

राज्यातील ग्रामीण व डोंगराळ भागात ज्या कुटुंबातील प्रौढ सदस्यांनी स्वेच्छेने अकुशल शारीरिक काम केले आहे, अशा प्रत्येक कुटुंबाला रोजगाराची हमी देऊन कामाचा अधिकार सुरक्षित करण्यासाठी वर्ष १९७७ मध्ये महाराष्ट्र रोजगार हमी कायदा करण्यात आला. वर्ष २००५ मध्ये त्याचे रूपांतर केंद्रीय कायद्यामध्ये झाले. लगेच दुसऱ्या वर्षी म्हणजे २००६ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व २००८ मध्ये ‘महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार योजना’, असे नामांतर झाले.

या योजनेत केंद्रांकडून शंभर दिवसांचे व उर्वरित २६५ दिवसांचा निधी राज्य सरकार देते. प्रारंभी या योजनेत मजुरी दर अल्प असताना धान्याचे कूपन देण्यात येत होते. यामध्ये वर्षनिहाय सुधारणा होत जाऊन आता रोख रक्कम मजुरांच्या आधार संलग्नित बॅंक खात्यात जमा केल्या जाते.

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आर्थिक सर्वेक्षणात ग्रामीण क्षेत्राचा ग्राहक किमती निर्देशांक सहा टक्के व शहरी क्षेत्रात तो ४.५ टक्के असल्याचे समोर आले आहे. काळ, काम व वेग या सूत्राने एक मजूर प्रतिदिन आठ तासांत किती काम करू शकतो, या बाबींवर मजुरीचे दर निश्चित केले जातात.

चारशे रुपये दर करण्याची मागणी

विद्यमान स्थितीत महाराष्ट्रात रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या मजुरांना २९७ रुपये दर दिला जातो. मजुरीचे दर केंद्र सरकारद्वारे निश्चित केले जातात. दर वर्षी एक एप्रिलला ते जाहीर करण्यात येतात. यंदा हे दर चारशे रुपये करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

India Economy: देशात सध्या अस्वस्थता : शरद पवार

Onion Price Crash: कांद्याच्या ढिगाऱ्यावर शेतकऱ्याचा आक्रोश

Petrol Diesel Price Hike: महागाईचा भडका, पेट्रोल- डिझेल ३ रुपयांनी महागले

Red Chilli Farming: लाल मिरची उत्पादनात प्रसिद्ध झालेले कापसी

SCROLL FOR NEXT