River Linking Project Agrowon
ॲग्रो विशेष

River Linking Project: सिंचन प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध

Drought Free Maharashtra: महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्यात अनेक सिंचन प्रकल्पांची कामे सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून नदीजोड प्रकल्प राबविण्यात येत आहे.

Team Agrowon

Nashik News: महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्यात अनेक सिंचन प्रकल्पांची कामे सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून नदीजोड प्रकल्प राबविण्यात येत आहे. दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी प्रस्तावित प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.

नदीजोड प्रकल्प हा उत्तर महाराष्ट्रासाठी वरदान आहे, असे प्रतिपादन जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले.जलसंपदा विभागाच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या (छत्रपती संभाजीनगर) कोकण–गोदावरी नदीजोड प्रकल्प कार्यालयाचे उ‌द्‍घाटन सिंचन भवन येथे रविवारी (ता. ३) झाले.

त्या वेळी श्री. विखे-पाटील बोलत होते. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ अध्यक्षस्थानी होते. अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ, क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे व भास्कर भगरे, आमदार सर्वश्री ॲड. राहुल ढिकले, प्रा. देवयानी फरांदे, दिलीप बनकर, डॉ. राहुल आहेर, हिरामण खोसकर, अमोल खताळ, आशुतोष काळे, काशीनाथ दाते, विठ्ठल लंघे तसेच अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, बाळासाहेब शेटे, उपसचिव प्रवीण कोल्हे, कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, गणेश हारदे आदी उपस्थित होते.

श्री. विखे म्हणाले, की उल्हास-वैतरणा नदीजोड प्रकल्पाचा डीपीआर तयार करण्यासाठी ६१ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा डीपीआर जानेवारी २०२६ पर्यंत शासनाला सादर होणार असून, त्यावर त्वरित कार्यवाही होईल.

पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी ३० प्रवाही वळण योजनांची कामे प्रगतिपथावर आहेत.  श्री. भुजबळ म्हणाले, की नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून उपलब्ध होणारे संपूर्ण ११५ टीएमसी पाणी पूर्णपणे गोदावरी खोऱ्यात वळवावे. 

नदीजोड प्रकल्पाचे समन्वय कार्यालय ठाणे येथे होते, ते नाशिकमध्ये स्थलांतरित झाल्याने पाठपुराव्याच्या दृष्टीने अत्यंत सोयीचे झाले आहे.
- नरहरी झिरवाळ, अन्न व औषध प्रशासनमंत्री
नदीजोड प्रकल्प कामासाठी लागणाऱ्या आवश्यक परवानगी वेळेत घेऊन डीपीआर व अनुषंगिक कामांना गती द्यावी.
- माणिकराव कोकाटे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनला मागणी वाढली; मेथीच्या दरात नरमाई, हळद-पपई स्थिर, लसूण भाव स्थिर

Paus Andaj: उद्यापासून पाऊस सुरु होणार; विदर्भ, कोकण, मराठवाड्यात पावसाची शक्यता

Rain Update : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत काही ठिकाणी तुरळक, हलका पाऊस

Herbal Plant Conservation : औषधी वनस्पतींच्या संवर्धनासाठी पाऊल

Chia Seed : वाशीममधील चियासीड पोहोचले मुख्यमंत्र्यांपर्यंत

SCROLL FOR NEXT