Crop Stress  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Stress : उन्हाच्या तीव्रतेमुळे पिकांची तहान वाढली

Rising Temperature : परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा फेब्रुवारीपासूच उन्हाचा चटका जाणवत आहेत. कमाल तापमानात सामान्य तापमानापेक्षा अधिक वाढ झाली आहे.

Team Agrowon

Parbhani News : परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा फेब्रुवारीपासूच उन्हाचा चटका जाणवत आहेत. कमाल तापमानात सामान्य तापमानापेक्षा अधिक वाढ झाली आहे. उशिरा पेरणी केलेली रब्बी पिके तसेच उन्हाळी पिके, फळे भाजीपाला पिकांची वाढ तसेच उत्पादनावर परिणाम झाला आहे. बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढल्याने उन्हाळी पिकांची पाण्याची गरज वाढली आहे. दुधाळ पशुधनास पाणी कमी पडत असल्यामुळे दुग्धव्यवसायावर परिणाम झाला आहे.

परभणी व हिंगोली जिल्ह्यांत गतवर्षीच्या पावसाचे प्रमाण अधिक राहिले. त्यामुळे सिंचन स्रोताना मुबलक पाणी उपलब्ध झाले होते. परंतु बेसुमार उपसा तसेच तापमानात झालेली वाढ यामुळे अनेक भागांतील विहिरींनी जानेवारी महिन्यात तळ गाठला.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी हवामानशास्त्र विभागाच्या वेधशाळेत घेतलेल्या नोंदीनुसार यंदा फेब्रुवारी महिन्यात कमाल तापमानात सामान्य तापमानापेक्षा १ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ झाल्याचे स्पष्ट झाले.

वेळेवर पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी, गहू, हरभरा पिकांची सुगी सुरू आहे. उन्हामुळे सकाळी लवकर तसेच दुपारी चार नंतर काढणीची कामे करावी लागत आहेत. तापमानातील वाढ आणि पाण्याच्या कमतरतेमुळे उशिरा पेरणी केलेला गहू, ज्वारी पिके सुकत आहेत.

टोमॅटो, विविध प्रकारच्या पालेभाज्या सुकत आहेत. कलिंगडाच्या फलधारणेवर परिणाम झाला आहे. केळी, ऊस पिकांची पाने करपत आहेत. सकाळी थंड आणि दिवसभराच्या उन्हामुळे आजाराचे प्रमाण वाढले आहे.

कमाल तापमान

तारिख २०२४ २०२५ फरक

२१ फेब्रुवारी ३४.७ ३४.६ उणे ०.१

२२ फेब्रुवारी ३२.६ ३४.७ अधिक २.१

२३ फेब्रुवारी ३०.८ ३४.० अधिक ३.२

२४ फेब्रुवारी ३२.४ ३५.० अधिक २.६

२५ फेब्रुवारी ३२.५ ३४.० अधिक १.५

किमान तापमान

तारिख २०२४ २०२५ फरक

२१ फेब्रुवारी १३.० १२.८ उणे ०.२

२२ फेब्रुवारी १२.७ १३.५ अधिक ०.८

२३ फेब्रुवारी १२.५ १३.२ अधिक ०.७

२४ फेब्रुवारी ११.४ १४.० अधिक २.६

२५ फेब्रुवारी १२.२ १२.५ अधिक ०.३

यंदा उन्हाळी हंगामात पेरणी केलेली दोन एकर बाजरी निसवण्याच्या अवस्थेत आहे. मूग वाढीच्या अवस्थेत आहे. दिवसाच्या तापमानात वाढ झाल्यामुळे पिकांना पंधरा दिवसांऐवजी दहा दिवसाला पाणी द्यावे लागत आहे. मुगाच्या वाढीवर परिणाम झाला आहे.पानाच्या कडा करपत आहेत. उत्पादनात घट येणार आहे.
- बाबासाहेब रन्हेर, कृषिभूषण सेंद्रिय, बाभळगाव, ता. पाथरी, जि. परभणी
उन्ह वाढल्याने जमिनीतील ओलावा उडून गेला. गहू, ज्वारी, हरभरा पिकांना एक पाणी कमी पडले. दाणे अपरिपक्व राहिल्याने उत्पादन घट येत आहे. गोठ्यातील ९० म्हशींच्या पाण्याची गरज भागत नाही. पाणी विकत घेऊन पिके जगवली. दुग्ध व्यवसायावर परिणाम झाला आहे.
- रामेश्‍वर मांडगे, दूध उत्पादक शेतकरी, बेलवाडी, ता. जि. हिंगोली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Baliraja Farm Road Scheme: मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी : जयकुमार गोरे

Solar Energy Projects: सांगलीत मागणीच्या ४० टक्के विजेची जिल्ह्यामध्येच निर्मिती

Healthy Village Campaign: ‘माझं गाव- आरोग्य संपन्न गाव’ अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद

Chinese Illegal Raisin: चीनच्या बेकायदा बेदाण्यामुळे शेतकरी संतप्त

Cotton Cultivation: कापूस लागवडीकडे कल, ‘एचटीबीटी’ शिरकावाची धास्ती

SCROLL FOR NEXT