Papaya Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Papaya Cultivation : पपई रोपांची दरवाढ; लागवड रखडत

Papaya Plantation : खानदेशात यंदा पपई लागवड अधिक होईल, असे संकेत असतानाच पपईची रोपे महागली आहेत.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात यंदा पपई लागवड अधिक होईल, असे संकेत असतानाच पपईची रोपे महागली आहेत. रोपांचे दरही वेगवेगळे आहे. अनेक कंपन्यांची रोपे ११ ते १७ रुपये प्रतिरोप, या दरात आता मिळत आहेत.

पपईचे दर टिकून आहेत. सध्या १२ ते १३ रुपये प्रतिकोलाच दर जागेवर पपई उत्पादकांना मिळत आहे. अनेक शेतकरी धाराशीव, जालना व धुळे आि स्थानिक भागातील रोपवाटिकांमधून रोपे घेत आहेत. पपईची रोपे नोव्हेंबरमध्ये मुबलक होती.

परंतु आता हंगामी किंवा नियमीत लागवड सुरू होत असतानाच पपई रोपे दरवाढ झाली आहे. मागील हंगामात १५ नंबर पपईची रोपे पोच नऊ ते १४ रुपये प्रतिरोप या दरात मिळत होती. यंदा किमान ११ व कमाल १७ रुपये प्रतिरोप, असे दर आहेत.

पपई दर नोव्हेंबरमध्ये टिकून होते. त्या वेळेस पपई रोपे आगाऊ नोंदणी वाढली. नंतर दर कमी होते. सध्या पपई लागवडीचे नियोजन अनेक जण करीत आहेत. पण पपईची रोपे कमी आहेत. पपई रोपांना धाराशिव, जालना, छत्रपतीसंभाजीनगर आदी भागातून मागणी आहे. दर टिकून राहील्याने पपई लागवडीसंबंधी शेतकऱ्यांत उत्साह होता.

रोपांच्या बुकींगला प्रतिसाद मिळाला. पण आता रोपांची दरवाढ झाली आहे. लागवड अधिक होईल, असेही संकेत आहेत. सध्या नंदुरबार, धुळे, जळगाव भागात १५ नंबर पपईची लागवड सुरू आहे. पण रोपे कमी पडत आहेत. अनेक कंपन्या रोपे पुरवठा हव्या त्या वेळी करीत नसल्याची स्थिती आहे.

पपईसाठी नंदुरबार प्रसिद्ध आहे. पण तेथे लागवड मात्र कमी होत आहे. यंदा तेथे तीन हजार हेक्टरवर पपई लागवड होईल अशी स्थिती आहे. मागील वेळेसही लागवड कमी झाली होती. पपई लागवडीसंबंधी रोपांची बुकींग सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये झाली असून, विविध कंपन्या, रोपवाटिकाचालकांनी रोप पुरवठा सुरू आहे.

अनेक शेतकरी मार्च ते मे या कालावधीतही पपईची लागवड करतात. यामुळे या महिन्यांत लागवडीच्या दृष्टीनेही नियोजन करण्यात आले आहे. पपई रोपांचे दर ११ ते १७ रुपये १५ नंबर वाणाच्या एका रोपासाठी आहेत. तसेच ७८६ वाणातही संशोधन करून विविध वाण विकसित करण्यात आले आहेत. त्यासंबंधीदेखील मागणी सुरू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

Farmers Protest : शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी मिळेपर्यंत हटणार नाही! भिलवडीत राजू शेट्टींचे कोरड्या कृष्णा नदीपात्रात ठिय्या आंदोलन

Banana Farmers : केळीच्या दांड्याचे वजन ठरतेय तोट्याचे; खरेदीदारांच्या मनमानीमुळे बळीराजा त्रस्त!

Drought Relief : दुष्काळी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करा; जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे कडक निर्देश

SCROLL FOR NEXT