Grape Crop Protection Agrowon
ॲग्रो विशेष

Grape Crop Cover : उन्हाच्या चटक्यापासून द्राक्ष बागा वाचविण्याचे प्रयत्न

Grape Protection : उन्हाचा चटका वाढत असून दिवसा कमाल ३७ अंशांपर्यंत तापमान पोहोचले आहे. परिणामी, वाढत्या उन्हामुळे काढणीयोग्य द्राक्ष घडांचे नुकसान होत आहे.

Team Agrowon

Nashik News : उन्हाचा चटका वाढत असून दिवसा कमाल ३७ अंशांपर्यंत तापमान पोहोचले आहे. परिणामी, वाढत्या उन्हामुळे काढणीयोग्य द्राक्ष घडांचे नुकसान होत आहे. त्यामुळे तीव्र सूर्यकिरणांपासून मालाचे संरक्षण करण्यासाठी बागांवर जुन्या साड्या व कपडा अंथरला जात आहे.

देशी जुगाड उपायांमुळे उन्हाचा तडाखा कमी होऊन द्राक्षांचे सन बर्निंगपासून संरक्षण होत आहे. द्राक्ष हंगाम शेवटच्या टप्प्यात आहे. यंदा अतिवृष्टी व मान्सूनोत्तर पावसामुळे द्राक्ष बागांमध्ये नुकसान होऊन ४० टक्क्यांपर्यंत उत्पादन कमी झाले.

त्यामुळे शेवटच्या टप्प्यात हंगाम आला असताना आता द्राक्षमाल कमी उपलब्ध असल्याने मागणी वाढती आहे. या परिस्थितीत मालाची प्रतवारी टिकून ठेवण्यासाठी शेतकरी हे उपाय करत आहेत. शेतकऱ्यांनी जुन्या साड्या व पांढऱ्या कापडाचे आच्छादन बागांवर टाकले आहे.

सध्या चांदवड, दिंडोरी व निफाड तालुक्यांतील द्राक्ष खुडे सुरू आहे. सध्या मालाची उपलब्धता कमी असल्याने दर टिकून आहेत. तर तापमान ३७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्यामुळे द्राक्षबागांना सन बर्निंगचा मोठा फटका बसण्याची भीती निर्माण झाली होती. उन्हाच्या तडाख्यामुळे द्राक्षांच्या गुणवत्तेवर परिणाम होऊन बाजारभाव गडगडण्याची शक्यता होती. त्यामुळे हे पर्याय वापरले जात आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT