Sugar Mills Agrowon
ॲग्रो विशेष

Rice Mill Industry : कच्चा मालाअभावी राइस मिल उद्योग संकटात

Paddy Production : सुमारे आठ लाख हेक्टर इतके क्षेत्र धानाखाली आहे. राज्यात वाघांसाठी प्रसिद्ध असलेला चंद्रपूर हा देखील धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Chandrapur News : प्रक्रिया उद्योगांची क्षमता वाढली असतानाच त्याकरिता अपेक्षित धानाची मात्र उपलब्धता होत नाही. परिणामी शेतकऱ्यांच्या घरी जात थेट त्यांच्याकडूनच मिळेल तितके धान खरेदी करण्याची वेळ जिल्ह्यातील प्रक्रिया उद्योजकांवर आली आहे. पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया तसेच नागपूरच्या काही भागांत अशा पाच जिल्ह्यांत मोठ्या क्षेत्रावर धानाची लागवड होते.

सुमारे आठ लाख हेक्टर इतके क्षेत्र धानाखाली आहे. राज्यात वाघांसाठी प्रसिद्ध असलेला चंद्रपूर हा देखील धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. या भागातील जमिनीचे गुणवैशिष्ट्य तसेच भौगोलिक स्थिती यामुळे या भागातील उत्पादित धानाला विशिष्ट चव देखील आहे.

त्याच्याच परिणामी चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या संख्येने धानावर प्रक्रिया करणारे उद्योग देखील उभे राहिले. जिल्ह्यात तब्बल २९७ प्रक्रिया उद्योग होते अशी माहिती प्रक्रिया उद्योजक जीवन कोटमवार यांनी दिली.

यातील बहुतांशी प्रक्रिया उद्योग हे मॅन्युअली ऑपरेटेड होते. त्यामुळेच काळाच्या ओघात त्यांचे अस्तित्व कमी झाले व अनेक उद्योग बंद पडतअसून, आज केवळ त्यांची संख्या ५० वर मर्यादित झाली आहे.

सध्या जिल्ह्यात असलेले प्रक्रिया उद्योग हे हायटेक असून त्यामध्ये मानवी हस्तक्षेप फार कमी आहे. कोट्यवधी रुपयांची यंत्रसामग्री त्याकरता खरेदी केली जाते. त्यातील एका प्रकल्पाची क्षमता तासाला १२ टन इतकी मोठी आहे. त्यामुळेच या प्रकल्पांना कच्चा मालाची अधिक गरज भासते.

परंतु जिल्ह्यात धान उत्पादन मर्यादित असल्याने अपेक्षित प्रमाणात प्रक्रिया उद्योगांना लागणारा धान उपलब्ध होत नाही. त्यामुळेच अनेक प्रक्रिया उद्योजक लगतच्या आंध्रप्रदेश, तेलंगण या राज्यातून कच्च्या मालाची उपलब्धता करतात.

वर्षभर प्रक्रिया उद्योग चालावा याकरिता अनेक उद्योजक हे धानाची साठवणूक देखील करतात. त्यातूनही गरज भासत नसल्याने थेट शेतकऱ्यांच्या दारी जात त्यांच्याकडून उपलब्ध असेल तितका धान खरेदी केला जातो अशी स्थिती निर्माण झाली आहे.

जिल्ह्यातील गावागावांत जात धान उत्पादक शेतकऱ्यांकडून थेट खरेदी केली जाते. शेतकऱ्यांनी सांगितलेल्या ठिकाणावरून संबंधित उद्योजकांची माणसेच धानाची उचल करतात. त्याकरिता हमाली देखील आकारली जात नाही.

मध्यस्थ नसल्याने कोणतेही कमिशन किंवा अडत आकारण्याचा देखील प्रश्न निर्माण होत नाही. हे सारे केवळ प्रक्रिया उद्योगाकरिता लागणाऱ्या कच्चा मालाची गरज भागवण्यासाठी नाइलाजाने करावे लागत असल्याची खंत प्रक्रिया उद्योजकांनी व्यक्त केली.

निर्यातक्षम तालुक्याचे उत्पादन व्हावे याकरिता अनेकांनी हायटेक प्रक्रिया उद्योग उभारले आहेत. त्यासाठी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. मात्र धानाची उपलब्धता अपेक्षित होत नाही. त्यासोबतच शेतकरी अनेक प्रकारचे वाण लावतात त्यामुळे देखील प्रक्रियेत अडचण निर्माण होते. आम्ही प्रशासनिक पातळीवर अनेकदा ‘एक गाव, एक वाण’ याला प्रोत्साहन देण्यासाठी पाठपुरावा केला, परंतु त्यात यश आले नाही. चंद्रपूरच्या भौगोलिक बाबीचा विचार करता या भागातील तांदळाला विशिष्ट गुणधर्मामुळे मागणी आहे. त्याकरिता सामूहिक प्रयत्न होणे अपेक्षित आहे.
- जीवन कोटमवार, सचिव, राइस मिल असोसिएशन.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

SCROLL FOR NEXT