Rice
Rice  Agrowon
ॲग्रो विशेष

Rice, Ragi Production : लांजात भात, तर राजापुरात नाचणी सर्वाधिक

Team Agrowon

Ratanagiri News : रत्नागिरी जिल्ह्याचा २०२१-२०२२ या वर्षाचा आर्थिक समालोचन अहवाल जाहीर झाला असून यामध्ये लांजा तालुक्यात ३ हजार २५० किलो प्रति हेक्टरी तांदळाची उत्पादकता (Rice Production) आहे. त्या तुलनेत गुहागर तालुक्यात सर्वांत कमी २ हजार ४१३ किलो प्रति हेक्टर उत्पादकता आहे.

नाचणीची सर्वाधिक उत्पादकता (Ragi Production) राजापूर तालुक्यात ३ हजार ३७ किलो प्रति हेक्टर आहे. उद्योग क्षेत्राचा अभाव आणि उत्पन्नाचा प्रमुख मार्ग शेती असल्यामुळे लांजा व राजापूर तालुक्यात अनुक्रमे भात आणि नाचणीची अधिक उत्पादकता असल्याचे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदले गेले आहे.

कोकणात अधिक पर्जन्यमान आहे. त्यामुळे तांदळाचे उत्पादन अधिक घेतले जाते. रत्नागिरीतील २०२१-२२ वर्षातील तांदळाचे क्षेत्रफळ ७०६ हेक्टर होते. जिल्ह्याचे तांदळाचे एकूण उत्पादन १ हजार ९९९ टन आहे.

लांजात शेती हाच प्रमुख उत्पन्नचा स्रोत असल्यामुळे भाताची उत्पादकता अधिक असल्याचे कारण आर्थिक समालोचन नमूद केले आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळांतर्गत असलेल्या प्रकल्पांची संख्या व सहकारी औद्योगिक विकास मंडळाच्या क्षेत्रांतर्गत प्रकल्पांची संख्या शून्य आहे.

याशिवाय विदेशी थेट गुंतवणूक, विशेष आर्थिक क्षेत्रंतर्गत उद्योगांची व मोठ्या उद्योगांची संख्या लांजा तालुक्यात २०२१-२२ या वर्षात वाढलेली नाही.

रासायनिक खतांचा संगमेश्वरात सर्वाधिक वापर

आर्थिक समालोचन अहवालानुसार खरीप हंगामात रासायनिक खतांचा २०२१-२२ वर्षात सर्वाधिक संगमेश्वर तालुक्यात २ हजार ६६८ टन केला गेला. तर सर्वांत कमी वापर खेड तालुक्यात आहे. मंडणगड तालुक्यात १७० टन आहे.

लांजा तालुक्यात प्रति हेक्टरी तांदळाची उत्पादकता अधिक होती, त्यात १ हजार ७३ टन रासायनिक खतांचा वापर केला आहे. नाचणीची सर्वाधिक उत्पादकता राजापूर तालुक्यात ३ हजार ३७ किलो प्रति हेक्टर आहे. तर सर्वांत कमी उत्पादकता संगमेश्वर तालुक्यात १ हजार ९१ किलो आहे.

लांजा तालुक्यात भाताची जास्त उत्पादकता अधिक असण्याचे संभाव्य कारण म्हणजे जमिनीतील सेंद्रिय कर्ब जास्त असणे आहे. या पट्ट्यातील जमीन अधिक उत्पादनशील आहे. शिवाय डोंगररांगा असल्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब पावसाळ्यात वाहत जमिनीत येऊन मिसळते आणि त्यामुळेच ही उत्पादकता अधिक स्वरूपात दिसते.
विजय दळवी, प्रभारी अधिकारी, कृषी संशोधन केंद्र-शिरगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Rate : वाढत्या उन्हामुळे साखरेला मागणी, दरातही वाढ

Food Security Scheme : अन्नसुरक्षा योजनेत पुरवल्या अप्रमाणित निविष्ठा

Jowar Market : पंचवीस हजार क्विंटल ज्वारीची कमी दराने विक्री

Heat Wave Maharashtra : उन्हाच्या चटक्याने राज्य होरपळले

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

SCROLL FOR NEXT