Kharip Paisewari Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Paisewari : नांदेडला सुधारित पैसेवारी पन्नास पैशांखाली

Crop Damage : खरीप नुकसानीचा अंदाज : अंतिमनंतर कळणार पीकस्थिती

Team Agrowon

Nanded News : नांदेड : जिल्ह्यातील खरीप हंगामाची नजर अंदाज पैसेवारी जाहीर झाल्यानंतर गुरुवारी (३१ ऑक्टोबर) महसूल प्रशासनाने खरिपाची सुधारित पैसेवारी जाहीर केली. यात जिल्ह्यातील सर्वच सोळा तालुक्यांची पैसेवारी पन्नास पैशाच्या आत जाहीर झाली आहे. यातून खरिपातील नुकसानीचा अंदाज येत आहे. अंतिम पैसेवारी जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील पिकांची स्थिती लक्षात येईल. जिल्हा प्रशासन दरवर्षी खरीप पिकांच्या परिस्थितीबाबत हंगामी, सुधारित व अंतिम पैसेवारी जाहीर करते. यातून पिकांच्या उत्पादकतेचा अंदाज येतो.

हंगामी नजरअंदाज पैसेवारी जिल्ह्यात असलेल्या एक हजार ५५५ गावात आठ लाख ५० हजार ७७४ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली येते. यापैकी यंदा सात लाख ९७ हजार ४६७ हेक्टरवर खरिपात पेरणी झाली आहे. या पेरणीक्षेत्रात पेरलेल्या पिकांच्या परिस्थितीचा अंदाज ता. ३० सप्टेंबर रोजी जाहीर झालेल्या हंगामी नजरी पैसेवारीवरून व्यक्त करण्यात आला होता. यात सर्वच तालुक्यांची पैसेवारी पन्नास पैशाच्याखाली जाहीर झाला होता.

यानंतर सुधारित अंदाज गुरुवारी (३१ आक्टोबर) जाहीर झाला. यात सर्वच सोळा तालुक्यांची पैसेवारी पन्नास पैशाच्या खाली जाहीर झाल्याचा अहवाल जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे. यानंतर १५ डिसेंबर रोजी अंतिम पैसेवारी जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील पिकांची स्थिती लक्षात येणार आहे.

तालुकानिहाय सुधारित पैसेवारी (कंसात गावांची संख्या)

नांदेड ४८ (८७), अर्धापूर ४८ (६४), कंधार ४८ (१२६), लोहा ४७ (१२६), भोकर ४९ (७९), मुदखेड ४९ (५४), हदगाव ४९ (१३७), हिमायतनगर ४८ (६४), किनवट ४८ (१९१), माहूर ४८ (८४), देगलूर ४९ (१०८), मुखेड ४८ (१३५), बिलोली ४४.५ (९२), नायगाव ४८.९१ (८९), धर्माबाद ४९ (५६), उमरी ४९ (६३). (नांदेड तालुक्यातील १७ गावांचे नागरीकरण झाले आहे.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar Vidhansabha Election : अहिल्यानगर जिल्ह्यात बंडखोरीने पक्षीय उमेदवारांचे वाढवले ‘टेन्शन’

Cotton Market : दर्यापूर बाजार समिती यार्डवर होणार कापूस लिलाव

Paddy MSP : भातपिकाला हमीभावाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

Livestock Census Survey : जळगावात पशुगणना सर्व्हेक्षण सुरू

Karnataka Sugar Factories : कर्नाटक सीमाभागातील साखर कारखाने सुरू; कोल्हापूर विभागातील उसाची होणार पळवापळवी

SCROLL FOR NEXT