Kharip crop  Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Paisewari : नांदेड जिल्ह्यात सुधारित पैसेवारी पन्नास पैशांखाली

Kharif Season : जिल्ह्यातील खरीप हंगामाची नजरी पैसेवारी जाहीर झाल्यानंतर मंगळवारी (३१ ऑक्टोबर) महसूल प्रशासनाने खरिपाची सुधारित पैसेवारी जाहीर केली.

Team Agrowon

Nanded News : जिल्ह्यातील खरीप हंगामाची नजरी पैसेवारी जाहीर झाल्यानंतर मंगळवारी (३१ ऑक्टोबर) महसूल प्रशासनाने खरिपाची सुधारित पैसेवारी जाहीर केली. यात जिल्ह्यातील सर्वच सोळा तालुक्यांची पैसेवारी पन्नास पैशांच्या आत जाहीर झाली आहे. यातून खरिपातील नुकसानीचा अंदाज येत आहे. अंतिम पैसेवारी जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील पिकांची स्थिती लक्षात येईल.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जिल्हा प्रशासन दरवर्षी खरीप पिकांच्या परिस्थितीबाबत हंगामी, सुधारित व अंतिम पैसेवारी जाहीर करते. यातून पिकांच्या उत्पादकतेचा अंदाज येतो. जिल्ह्यात असलेल्या एक हजार ५६२ गावात आठ लाख ७१ हजार ४०० हेक्टर क्षेत्र लागवडीखाली येते. यापैकी यंदा सात लाख ९८ हजार ५६८ हेक्टरवर खरिपात पेरणी झाली आहे.

या पेरणीक्षेत्रात पेरलेल्या पिकांच्या परिस्थितीचा सुधारित अंदाज सोमवारी (ता. ३१) सुधारित पैसेवारीवरून व्यक्त करण्यात आला आहे. यात सर्वच सोळा तालुक्याची पैसेवारी पन्नास पैशाच्या खाली जाहीर झाल्याचा अहवाल जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे. यानंतर १५ डिसेंबर रोजी अंतिम पैसेवारी जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील पिकांची स्थिती लक्षात येणार आहे.

तालुकानिहाय नजरी पैसेवारी

(कंसात गावांची संख्या) नांदेड ४७ (८८), अर्धापूर ४८.३३ (६४), कंधार ४८ (१२६), लोहा ४६ (१२७), भोकर ४८ (७७), मुदखेड ४८ (५५), हदगाव ४९ (१३७), हिमायतनगर ४८ (६४), किनवट ४७.६ (१९१), माहूर ४८ (९२), देगलूर ४९ (१०८), मुखेड ४६ (१३५), बिलोली ४७ (९१), नायगाव ४८ (८९), धर्माबाद ४९ (५६), उमरी ४९ (६२). (नांदेड तालुक्यातील १३ गावांचे नागरीकरण झाले आहे.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीच्या कारभाराची होणार चौकशी

Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही

White Grub Pest Management: हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन मोहीम

Central Government Policy: कांदा, साखर उद्योगांबाबत बुधवारपर्यंत केंद्र निर्णय घेईल : आमदार दिलीप वळसे पाटील

Soybean Oil Demand: अमेरिकेत जैवइंधनासाठी सोयातेलाचा वापर वाढता

SCROLL FOR NEXT