Bank  Agrowon
ॲग्रो विशेष

Cooperative Bank : अकलूजच्या शंकरराव मोहिते पाटील बँकेवर निर्बंध

रिझर्व्ह बँकेचे मुख्य सरव्यवस्थापक योगेश दयाल यांनी यासंबंधीचे आदेश काढले आहेत.

Team Agrowon

Solapur Bank : जिल्ह्यातील अकलूज येथील शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँकेवर (Shankarao Mohite Patil Cooperative Bank) रिझर्व्ह बँकेने काही निर्बंध घातले असून, या बँकेतील खातेदारांना आता पाच हजार रुपयांपर्यंतचीच रक्कम काढता येणार आहे. २४ फेब्रुवारीपासून पुढील सहा महिन्यांसाठी हे निर्बंध असणार आहेत.

रिझर्व्ह बँकेचे मुख्य सरव्यवस्थापक योगेश दयाल यांनी यासंबंधीचे आदेश काढले आहेत. रिझर्व्ह बँकेने बँकेच्या खर्चावरही नियंत्रण आणण्याच्या सूचना केल्या आहेत.

बँकेचे पात्र ठेवीदार हे विमा आणि क्रेडिट हमी नियमाप्रमाणे पाच लाख रुपयापर्यंतची जमा विमा दावा रक्कम मिळवण्यास पात्र असणार आहेत. येत्या ४५ दिवसांमध्ये बँकेला डीआयसीजीसीकडे (डिपॅाझिट इन्शुरन्स अॅण्ड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन) ठेवीदारांची यादी सादर करावी लागणार आहे.

शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँकेच्या एकूण नऊ शाखा व एक मुख्यालय अशी दहा कार्यालये आहेत. ६ हजार ४८० एवढे बँकेचे सभासद आहेत. बँकेकडे ६९ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. तर बँकेकडून ४० कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आलेले आहे.

बँकेच्या ठेवीदार व सभासदांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, बँकेला सुस्थितीत आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने हे निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने बँक अधिकारी-कर्मचाऱ्यांची बैठक घेतली आहे. रिझर्व्ह बँकेच्या सूचनांचे पालन बँकेकडून होणे अपेक्षित आहे. तशा सूचना बँकेला दिल्या आहेत.
किरण गायकवाड, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था), सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Harvesting: ऊस तोडणीसाठी योग्य वेळापत्रकाची गरज

Agrowon Diwali Article: शेतीनं तारलंच नव्हे, तर उभं केलं...

GM Foods: देशात जीएम खाद्यपदार्थ आयात, विक्रीवर बंदी! हायकोर्टाचा 'हा' निर्णय शेतकऱ्यांसाठी का आहे महत्त्वाचा?

Agrowon Diwali Article: शेतीतून जगण्याचे बळ अन् समृद्धी मिळाली

Artificial Intelligence: ‘एआय’ शी संलग्न डीएसएस, डिजिटल ट्विन प्रणाली 

SCROLL FOR NEXT