Water Supply Scheme  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Supply Scheme : मुळशी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा वीजजोड पूर्ववत

Electricity : वीजबिल थकल्याने मुळशी प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेचे वीजजोड महावितरणने खंडित केले होते. त्यामुळे तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील गावे आणि वाड्यावस्त्यांना पाण्यासाठी कसरत करावी लागली.

गणेश कोरे

Pune News : वीजबिल थकल्याने मुळशी प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेचे वीजजोड महावितरणने खंडित केले होते. त्यामुळे तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील गावे आणि वाड्यावस्त्यांना पाण्यासाठी कसरत करावी लागली.

तथापि काही ग्रामपंचायतींनी तातडीने भरलेली पाणीपट्टी आणि जिल्हा नियोजन समितीचे माजी संचालक अमित कंधारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वीय सहायकामार्फत केलेला पाठपुरावा यामुळे पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत झाला.

तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील २१ गावे आणि वाड्या-वस्त्यांवर पाणी पोहोचविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राज्य सरकारने प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजना राबविली. या योजनेमुळे गावे, वाड्या-वस्त्यांवर पाणी पोहोचले.

परंतु पाणी वापरूनही पाणीपट्टीची बिले ग्रामस्थ वेळेवर ग्रामपंचायतीत भरत नाहीत. परिणामी ग्रामपंचायतींनाही ही बिले जिल्हा परिषदेत भरता येत नाही. पाणीपट्टी थकल्याने अनेक अडचणींना तोंड देण्याची वेळ या विभागाच्या प्रशासनावर आली आहे.

एकंदर ऑक्टोबरअखेर या योजनेची दोन कोटी ८७ लाख रुपये थकबाकी आहे. तर सप्टेंबरअखेरपर्यंत महावितरणचे ४७ लाख ३९ हजार रुपयांचे वीजबिलही थकले आहे. त्यामुळे तीन दिवसांपूर्वी नाइलाजास्तव महावितरणला वीजपुरवठा खंडीत करावा लागला.

दरम्यान संभवे (११ हजार), जामगाव ( पन्नास हजार), पौड (दोन लाख), भादस (एक लाख), चाले (पन्नास हजार), दारवली (एक लाख), मुगावडे (पन्नास हजार), अंबडवेट ( एक लाख पस्तीस हजार), पिरंगुट (दहा लाख), शेरे (पन्नास हजार), कासारआंबोली (पाच लाख), घोटावडे (पाच लाख) या बारा ग्रामपंचायतींनी पाणीपट्टी दिल्याने २७ लाख ४६ हजार रुपये वीजबिल भरण्यात आला.

ग्रामपंचायत निवडणुकांमुळे करवसुलीवर परिणाम झाल्याचे लेखी कारण पंचायत समितीने महावितरणला दिले. जिल्हा नियोजन समितीचे माजी संचालक अमित कंधारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वीय सहायकाच्या मदतीने पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला. त्यामुळे शुक्रवारी (ता.३) सायंकाळी पुन्हा वीजजोड दिल्याने पाणीपुरवठा सुरळीत सुरू झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

NHB Subsidy Cut: लेखाजोखा ‘एनएचबी’चा!

AI in Agriculture: कृषीतील एआय, रोबोटिक्स, ड्रोन तंत्रज्ञानाला नवी दिशा

POCRA Project Audit: ‘पोकरा’ प्रकल्पाचे पूर्ण लेखापरीक्षण करा: किशोर तिवारी

Women’s Freedom and Equality: स्त्रीला जोखडात बांधणारी विचारसरणी उखडून फेका: राहुल गांधी

Kharif Crop Growth: खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील पिके बहरली

SCROLL FOR NEXT