Water Tanker
Water TankerAgrowon

Water Tanker Supply : अमरावतीतील ११ गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा

Water Supply News : जून महिना संपत आला असून, अद्यापही पाऊस बरसलेला नाही. दुसरीकडे कडाक्याच्या उन्हाळ्यात चिखलदरावासीयांना टँकरद्वारे आपली तहान भागवावी लागत आहे.
Published on

Amravati Water News : जून महिना संपत आला असून, अद्यापही पाऊस बरसलेला नाही. दुसरीकडे कडाक्याच्या उन्हाळ्यात चिखलदरावासीयांना टँकरद्वारे आपली तहान भागवावी लागत आहे. जिल्ह्यातील ११ गावांमध्ये १४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे पावसाचे लवकर आगमन झाले नाही तर टँकर अवलंबित्वाची गावांच्या संख्येत वाढ होणार आहे.

विशेष म्हणजे मागील काही दिवसांपर्यंत निम्म्यावर असलेले विहीर अधिग्रहण दुप्पट वाढले असून, सध्या जिल्ह्यातील ८४ गावांमध्ये ७७ खासगी विहिरींचे अधिग्रहण करून ग्रामस्थांची तहान भागविण्यात येत आहे.

जिल्ह्यात यंदा तीव्र पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. एप्रिल, मे महिन्यांत ५ ते ६ गावांना टँकर लागले होते, तर जूनमध्ये त्यामध्ये वाढ होऊन १४ टँकरने पाणीपुरवठा होत आहे. ८४ गावांमध्ये खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

...तर टंचाई वाढणार

जून महिना अर्धा आटोपला आहे. अद्यापही दमदार पावसाने हजेरी लावलेली नाही. शेतकऱ्यांनी पेरण्याची तयारी सुरू केली असली तरी अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाने दडी मारल्याने ग्रामीण भागातील पाणीटंचाईसुद्धा तीव्र होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा विभाग सज्ज झाला आहे.

Water Tanker
Tanker Water Supply : साताऱ्यात २१ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा

तालुका : गावे

चांदूररेल्वे : सावंगी मग्रापूर

चिखलदरा : आकी, मोथा, टोंगला, रायपूर, सोमवारखेंडा, बगदरी, धरमडोह, खडीमल, एकझीरा, गौलखेडाबाजार.

टंचाईग्रस्त गावांमध्ये विविध उपाययोजना करण्यात येत असून, ज्या गावात पाणीटंचाई निर्माण होईल, तेथे त्वरित उपाययोजना करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
संदीप देशमुख, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com