ZP Akola Agrowon
ॲग्रो विशेष

ZP Akola : अकोला जिल्हा परिषदेत ओल्या दुष्काळाबाबत ठराव मंजूर

Wet Drought Update : यंदा जिल्ह्यात सातत्याने पाऊस झाल्याने खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शासनाने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी असलेला ठराव जिल्हा परिषदेच्या कृषी समिती सभेत घेण्यात आला.

Team Agrowon

Akola News : यंदा जिल्ह्यात सातत्याने पाऊस झाल्याने खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शासनाने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी असलेला ठराव जिल्हा परिषदेच्या कृषी समिती सभेत घेण्यात आला. हा प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाणार आहे.

बुधवारी (ता. ११) जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती योगिता रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी समिती सभेत हा ठराव घेतल्या गेला. सभेत या वेळी अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.

नीता गवई, अर्चना राऊत, रायसिंग राठोड, बार्शीटाकळी पंचायत समिती सभापती सुनंदा मानवतकर आदी समिती सदस्य बैठकीला उपस्थित होते. सभेचे कामकाज कृषी विकास अधिकारी डॉ. तुषार जाधव यांनी पार पाडले.

जिल्हा कृषी अधिकारी मिलिंद जंजाळ, जिल्हा कृषी अधिकारी (सामान्य) सुनंदा दळवी, गजानन गायकवाड आदी कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून खरिपातील पिके येणे अशक्य आहे. शेतकऱ्यांचे नुकसान लक्षात घेता ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट भरपाई द्यावी, असा ठराव सभापती रोकडे यांनी मंजूर केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT