Hingoli News : हिंगोली जिल्ह्यातील पिंपळदरी (ता. औंढा नागनाथ) येथे बुधवारी (ता. १७) पारंपारिक बियाणे महोत्सव आयोजित करण्यात आला होता. सर्व आदिवासी शेतकऱ्यांनी आपल्याकडील पारंपारिक बियाण्यांचे संकलन, जोपासना, वाढ व संवर्धन करुन पारंपारिक बियाणे बँक स्थापन करुन परिसरातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात बियाणे उपलब्ध करुन देण्याचा संकल्प जाहीर केला.
नागपूर येथील महाराष्ट्र आर. आर. ए. नेटवर्क, हैदराबाद येथील आर. आर. ए. नेटवर्क, उमरा (ता. कळमनुरी) येथील उगम ग्रामीण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळदरी येथे आदिवासी समाजातील शेतकरी महिला व पुरुषांसाठी पारंपारिक बियाणे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी उगम ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष जयाजी पाईकराव होते. कृषिविद्या विशेषज्ञ राजेश भालेराव, आर. आर. ए. नेटवर्क वर्धा येथील अनिकेत लिखार होते. यावेळी गंगाधर इंगोले, सुशीला पाईकराव, सरपंच रत्नकला संजय भुरके, बालाजी नरवाडे, कलावती सवंडकर आदींची उपस्थिती होती.
आमदरी, राजदरी, सोनवाडी आणि पिंपळदरी येथील आदिवासी समाजातील ११३ शेतकरी महिला व पुरुष उपस्थित होते. या भालेराव म्हणाले, की डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन कार्यक्रमाचा लाभ या सर्व शेतकऱ्यांना मिळवून देता येईल.
या चारही गावातील ७५० आदिवासी शेतकऱ्यांच्या प्रत्येकी एक हेक्टर जमिनीवर पारंपारिक बियाणे वापरून शेतीमध्ये भरघोस उत्पन्न मिळवण्याच्या दृष्टीने ४०० शेतकऱ्यांचे शेतातील मातीचे नमुने तपासून त्याप्रमाणे मातीच्या आरोग्य सुधारणाचे प्रयत्न केले जाणार असल्याचे नमूद करण्यात आले. यशस्वितेसाठी किशन बर्गे, पिंटू गुहाडे, आप्पाराव कराळे, चांदू मोरे, तातेराव रिठे, महेश ठोंबरे, आनंदराव इंगोले, तुकाराम भगत, नामदेवराव रिठे, निशांत पाईकराव यांनी प्रयत्न केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.