Vegetable  Agrowon
ॲग्रो विशेष

Vegetable Research : एकार्जुना येथे ३१ कोटींतून होणार भाजीपाल्यावर संशोधन

Cash Crop : पूर्व विदर्भात भाजीपाल्यासारख्या व्यावसायिक आणि नगदी पिकाला प्रोत्साहन मिळावे याकरिता वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने एकार्जुना (चंद्रपूर) येथे भाजीपाला संशोधन केंद्र मंजूर करण्यात आले आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : पूर्व विदर्भात भाजीपाल्यासारख्या व्यावसायिक आणि नगदी पिकाला प्रोत्साहन मिळावे याकरिता वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने एकार्जुना (चंद्रपूर) येथे भाजीपाला संशोधन केंद्र मंजूर करण्यात आले आहे.

याकरिता तब्बल ३१ कोटी ९० लाख रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी नागपूर दौऱ्यात दिली.

डॉ. गडाख म्हणाले, की वाण संवर्धन, उत्पादकता वाढ, कोरडवाहू क्षेत्राकरिता पूरक भाजीपाला पिके, अजैविक ताण सहन करणारे वाण, मूल्यवर्धन, प्रकिया तसेच बाजारपेठ अशा सर्वच टप्प्यांवर भाजीपाला संशोधन केंद्राच्या माध्यमातून काम होणार आहे. भाजीपाल्याचे देशी वाण संकलित करून त्याचे बियाणे उत्पादन व लागवड त्यासोबतच सेंद्रिय भाजीपाला उत्पादकतेलाही प्रोत्साहन देण्याचे प्रस्तावित आहे.

वर्धा जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी देखील शेतीमध्ये नव प्रयोगांना प्रोत्साहन देण्यावर भर दिला आहे. त्यांच्या पुढाकाराने वर्धा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीसाठी शेतकरी पुढे येत आहे. परिणामी, या पिकात संशोधनाला चालना मिळावी याकरिता जिल्हा नियोजन समितीतून १५ लाख रुपयांचा स्ट्रॉबेरी संशोधन प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे.

केव्हीके सेलसुरा (वर्धा) यांच्या माध्यमातून या प्रकल्पाची अंमलबजावणी होत आहे. प्रात्यक्षिक प्लॉट, शेतकरी प्रशिक्षण, रोप निर्मिती अशी कामे यातून होतील. ५० शेतकऱ्यांच्या शेतावर केव्हीकेच्या मार्गदर्शनात लागवड केली जाईल.

कृषी विद्यापीठात रब्बी शिवार फेरी

रब्बी हंगामात बीजोत्पादन क्षेत्र एक हजार हेक्‍टरवर नेण्यात आले आहे. त्यासोबतच हरभरा, करडई, मोहरी, ज्वारी, गहू अशा पिकांची लागवड करण्यात आली आहे. विद्यापीठाचे वाण, तंत्रज्ञान याचा वापर करुन दर्जेदार आणि बहरलेले हे पीक ‘याची देही याची डोळा’ ३१ जानेवारी रोजीच्या रब्बी शिवार फेरीतून पाहता येणार आहे.

कृषी विभागाचे सहायक ते त्यापुढील अधिकारी, कर्मचारी, प्रयोगशील शेतकरी, केव्हीके तज्ज्ञांना हे लाईव्ह तंत्रज्ञान अनुभवता येईल, असे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT