soyabean cultivation 
ॲग्रो विशेष

Soyabean Crop : सोयाबीन पिकासाठी वाढ उत्तेजकावर संशोधन ; डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा प्रयोग

Panjabrao Deshmukh Agricultural University : सोयाबीन पिकात ‘कायटोसॅन’ या घटकाचा वापर वाढ उत्तेजक म्हणून करता येईल का? याची चाचपणी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गतच्या यवतमाळ येथील जैव तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या वतीने करण्यात येत आहे

Team Agrowon

Yavatmal News : सोयाबीन पिकात ‘कायटोसॅन’ या घटकाचा वापर वाढ उत्तेजक म्हणून करता येईल का? याची चाचपणी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गतच्या यवतमाळ येथील जैव तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या वतीने करण्यात येत आहे. बुलडाणा, अकोला, वाशीम, वर्धा, अमरावती जिल्ह्यांत या संदर्भाने चाचण्या घेण्यात येत असल्याचे या प्रकल्पाचे प्रमुख डॉ. प्रशांत शिंगोटे यांनी सांगितले.

राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग मुंबईकडून या प्रकल्पास ६२.३६ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. डिसेंबर २०२२ पासून सुरु झालेल्या या प्रकल्पाचा कालावधी तीन वर्षांचा आहे. ‘जैविकदृष्ट्या संश्‍लेषित ‘कायटोसॅन’ कायटोसॅन नॅनो कणांचे उत्तेजक वाढवर्धक प्रभावी माध्यम’ असे या प्रकल्पाचे नाव आहे. त्याकरिता समुद्री सजिवांच्या स्रोतातून मिळविलेल्या घटकांवर तांत्रिक प्रक्रियेतून ‘कायटोसॅन’ मिळविले जाते. सुरुवातीच्या काळात सोयाबीन पिकाची योग्य वाढ करून घेण्यासाठी ‘कायटोसॅन’चा वाढउत्तेजक (बायोस्टीमूल्यंट) म्हणून वापराची चाचपणी केली जात आहे.

पाण्याचा ताण असलेल्या काळात याची फवारणी केल्यानंतर पिकाची चांगली वाढ होते. सध्या सोयाबीनमध्ये याचा प्रभाव तपासला जात आहे. त्यानंतर अन्य पिकात वापर करून त्याचीही निरीक्षणे घेतली जातील.’’ असे डॉ. प्रशांत शिंगोटे यांनी सांगितले. एका अर्थी ‘कायटोसॅन हे ‘स्ट्रेस टॉलरंट’ (अजैविक ताण सहनशीलता) व रोग प्रतिकारक म्हणून पर्याय ठरू शकतो, असेही यापूर्वीच्या अभ्यासाचे निरीक्षण आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Forest Area : राज्याचे वनक्षेत्र आकसत असल्याने चिंतेत भर

Mumbai APMC Scam : मुंबई बाजार समितीमधील रस्ते काँक्रीट निविदा घोटाळा

Onion Subsidy : फेरछाननीअंती १४ हजार शेतकरी प्रलंबित कांदा अनुदानास पात्र

Sugar Export : साखर निर्यातीचे उद्दिष्ट अपूर्ण राहण्याची शक्यता

Rain Alert Maharashtra : कोकण, घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’

SCROLL FOR NEXT