Crop Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Loan Deadline : पीककर्जासाठी प्रशासनाकडे ३० एप्रिलपर्यंतच्या मुदतीची मागणी

Crop Loan Update : पीककर्जासाठी ३ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळविण्यासाठीची, कर्ज परतफेडीची सेवा सहकारी सोसायटीची अंतिम मुदत ३१ मार्च आहे.

Team Agrowon

Washim News : पीककर्जासाठी ३ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळविण्यासाठीची, कर्ज परतफेडीची सेवा सहकारी सोसायटीची अंतिम मुदत ३१ मार्च आहे. पंरतु मध्य प्रदेश प्रशासनातील सहकार विभागातील अप्पर सचिवांनी पत्र काढून शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी एक महिना मुदतवाढ दिली.

सेवा सह सोसायटीचे कर्ज परतफेड ३० एप्रिलपर्यंत करण्याचा निर्णय तेथे घेतला आहे. येथेही पीककर्जासाठी प्रशासनाने ३० एप्रिलची मुदत देण्यात यावी अशी मागणी भूमिपूत्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांनी केली आहे.

याबाबत म्हटले आहे, की मध्य प्रदेश सरकारने घेतल्या निर्णयाप्रमाणेच महाराष्ट्रातील सहकार व पणन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीसुद्धा निर्णय घेतला पाहिजे. याबाबत भूमिपुत्र संघटनेने राज्याचे राज्यपाल, पणन संचालक व सचिव सहकारांना सविस्तर निवेदनही दिले. ३१ मार्च कुठल्याच परिस्थितीत शेतकऱ्यांना बँक भरण्यासाठी योग्य तारीख नाही.

शेतकऱ्यांना शेतातील मालाची मातीमोल भावाने विक्री करून पैसे उभे करावे लागतात किंवा व्याजाने काढून बँक भरावी लागते. त्यामुळे ३१ मार्चऐवजी ३० एप्रिल ही व्याज माफीची तारीख निश्चित करण्यासंदर्भात पत्र काढावे. सहकारी बँक पीककर्जासाठी व्याज माफीकरिता ३१ मार्चची अट घालते. तर राष्ट्रीयकृत बँका मुदत वर्षभर देतात. हा सुद्धा दुटप्पीपणा दिसत असून याबाबत राज्यकर्ते बोलत नाहीत, हे शेतकऱ्यांचे दुर्दैव आहे, असे भुतेकर यांनी म्हटले आहे.

आचारसंहिता असूनही मध्य प्रदेशच्या सहकार सचिवांनी पीककर्ज परतफेडीसाठी ३१ मार्चऐवजी ३० एप्रिलपर्यंत परतफेडीची मुदत वाढवून दिली आहे. तोच निर्णय महाराष्ट्रातील प्रशासनाने घ्यावा, असेही भूमिपूत्र संघटनेने म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : कोकणातील शेतकऱ्यांना लवकरच मिळणार नुकसान मदत आणि भरपाई; कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत ग्वाही

Organic Farming Story: आघातांनीच दाखविला आरोग्यदायी शेतीचा मार्ग

India Biofortified Crops: जैवसंपोषण : आर्थिक विकासाची किल्ली

Pulses Procurement Challenges: थेट खरेदीच्या वल्गना

Water Lifting Ban: कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात उद्यापर्यंत उपसाबंदी शिथिल

SCROLL FOR NEXT