Crop Damage Flood Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : पीक नुकसानीची तक्रार ७२ तासांच्या आत नोंदवा

Team Agrowon

Akola News : गेल्या काही दिवसांतील नैसर्गिक आपत्तीमुळे खरीप पिकांचे नुकसान झाले असेल तर शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत पीकविमा योजनेअंतर्गत पूर्वसूचना नोंदवावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पीक नुकसान झाले असल्यास नुकसान झाल्यापासून ७२ तासांच्या आत नोंद करणे गरजेचे आहे. यासाठी पूर्वसूचना टोल फ्री १४४४७ या क्रमांकावर नोंदवता येईल. किंवा क्रॉप इन्शुरन्स ॲपचा वापर करावा, असेही त्यांनी म्हटले आहे.

ॲपवर अशी नोंदवा पीक नुकसानीची तक्रार

पहिल्यांदा प्ले स्टोअर मधून Crop Insurance App (क्रॉप इन्शुरन्स अॅप) अॅप डाउनलोड करावे.

ॲप उघडल्या नंतर Continue as Guest हा पर्याय निवडावा.

पीक नुकसान / पीक लॉसचा पर्याय निवडावा.

Crop Loss Intimation / पीक नुकसानीची पूर्वसूचना हा पर्याय निवडावा.

मोबाईल क्रमांक टाकावा.

ओटीपी प्राप्त करून सादर करावा.

हंगाम खरीप, वर्ष २०२४, योजना आणि राज्य निवडावे

नोंदणीचा स्रोत CSC निवडावा आणि आपल्याकडे पॉलिसी नंबर आहे का, या समोरील रेडिओ बटन क्लिक करावे आणि विमा पावती क्रमांक टाकावा आणि Done करावे.

पुढे विमा पावती क्रमांकावर टीक करावे.

पुढे पॉलिसी नंबर तपशील दिसेल.

ज्या गट क्रमांकामधील पिकाची तक्रार करायची आहे, तो अर्ज निवडावा (प्रत्येक गटाकरिता स्वतंत्र तक्रार करावी.)

पुढे घटनेचा प्रकार - Excess Rainfall किंवा Inundation निवडावा, घटनेचा दिनांक -ज्या दिवशी पावसाने नुकसान झाले आहे तो दिनांक टाकावा. पीक वाढीचा टप्पा - Standing आणि नुकसान टक्केवारी टाकावी.

बाधित पिकाचा फोटो घ्यावा आणि Submit/सादर करा हा पर्याय निवडावा

त्यानंतर आपली तक्रार यशस्वीरीत्या दाखल होईल आणि एक Docket id मिळेल तो जतन करून ठेवावा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Cotton Anudan : २६ सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सोयाबीन, कापूस अनुदान जमा होणार; कृषिमंत्री मुंडेंनी दिली माहिती

Agriculture Power Bill : कृषी वीज बिले दुरूस्त करा अन्यथा आंदोलन, इरिगेशन फेडरेशनकडून इशारा

Agriculture Management : पुरातही पिके वाचविणारी ‘एसआरटी’ पद्धत

Agriculture Import Export : आयात-निर्यातीत हवी समयसूचकता

PM Kisan Scheme : पी.एम.किसान योजना; अठराव्या हप्त्यास शेतकरी मुकणार, तेरा हजार खाती आधार लिंकविना

SCROLL FOR NEXT