Cabinet Meeting Agrowon
ॲग्रो विशेष

Animal Husbandry and Dairying Department : पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाची पुनर्रचना

Maharashtra Cabinet Meeting Decision : पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागाची पुनर्रचना करून या विभागाचे नामकरण ‘पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभाग’ असे करण्यास गुरुवारी (ता. १०) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

Team Agrowon

Mumbai News : पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागाची पुनर्रचना करून या विभागाचे नामकरण ‘पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभाग’ असे करण्यास गुरुवारी (ता. १०) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

पुनर्रचनेनंतर पशुसंवर्धन आयुक्तालय व दुग्ध व्यवसाय आयुक्तालयाचे एकत्रीकरण करून पुनर्रचनेनंतर आयुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय असे या पदाचे नाव राहील. राज्यातील ३५१ तालुक्यांत तालुका पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय अधिकारी कार्यालय सुरू करण्यात येईल.

त्याचप्रमाणे १६९ तालुक्यांत तालुका लघू पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय सुरू करण्यात येतील. राज्यातील २ हजार ८४१ पशू वैद्यकीय श्रेणी दोन दवाखान्यांचे श्रेणी एक दवाखान्यात श्रेणीवाढ करण्यात येईल. त्याशिवाय १२ हजार २२२ नियमित पदांना व कंत्राटी तत्वावरील ३ हजार ३३० पदे यांच्या वेतनासाठी १६८१ कोटी रुपये खर्चास मान्यता देण्यात आली.

बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्रासाठी ७०९ कोटींचा अतिरिक्त निधी

हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील बाळासाहेब ठाकरे हळद (हरिद्रा) संशोधन व प्रशिक्षण केंद्रासाठी ७०९ कोटी २७ लाख रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अध्यक्षस्थानी होते. या केंद्रासाठी मंजूर अतिरिक्त निधी टप्पेनिहाय वितरीत करण्यात येणार आहे. हळदीवरील संशोधनासाठी तसेच निर्यातक्षम उत्पान बनवfण्यासाठी हे केंद्र स्थापन करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

Zilla Parishad Seizure Action: यवतमाळ जिल्हा परिषदेवर जप्तीच्या कारवाईची नामुष्की

Revenue Communication Initiative: ‘शेतकरी हक्क जागर, शेतकऱ्यांसाठी महसूल संवाद ’

Raisin Making at Home: वेलीवरच सुकवून द्राक्षांपासून बेदाणा तयार करण्याची सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT