Sculptor Ram Sutar Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Bhushan Award: ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण

Sculptor Ram Sutar: ज्येष्ठ शिल्पकार राम व्ही. सुतार यांना महाराष्ट्र भूषण २०२४ हा राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर करण्यात आला आहे. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’सह अनेक ऐतिहासिक स्मारके घडवणाऱ्या सुतार यांनी शिल्पकलेत अमूल्य योगदान दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याबाबत घोषणा केली.

Team Agrowon

Mumbai News : महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४’ ज्येष्ठ शिल्पकार राम व्ही. सुतार यांना गुरुवारी (ता. २०) जाहीर करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या बाबतची घोषणा केली.

२५ लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार साहित्य, कला, क्रीडा, विज्ञान, समाजसेवा आदी क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीसाठी दरवर्षी दिला जातो. यंदा शिल्पकलेतील अतुलनीय योगदानासाठी राम सुतार यांची निवड झाली आहे.

राम सुतार हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार असून, त्यांनी भारताच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाला शिल्पांच्या माध्यमातून अमरत्व बहाल केले आहे. त्यांनी साकारलेली गुजरातमधील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ ही सरदार वल्लभभाई पटेल यांची १८२ मीटर उंचीचा पुतळा हा जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून ओळखला जातो.

याशिवाय, महात्मा गांधी यांचे अनेक पुतळे, चंबळ स्मारक, बेंगळुरू विमानतळावरील केम्पेगौडा पुतळा अशा अनेक स्मारकांनी त्यांनी देशभरात आपल्या शिल्पकलेची छाप सोडली आहे. वयाच्या शंभराव्या वर्षीही ते शिल्पकलेत कार्यरत आहेत, हीच त्यांच्या समर्पणाची खरी ओळख आहे.

१९ फेब्रुवारी, १९२५ रोजी धुळे जिल्ह्यातील गोंदूर गावात जन्मलेल्या राम सुतार यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून शिक्षण घेतले. त्यांना १९९९ मध्ये पद्मश्री आणि २०१६ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या निर्मितीने त्यांना जागतिक कीर्ती मिळवून दिली. आजही ते आपल्या स्टुडिओत नव्या शिल्पांवर काम करत आहेत.

पुरस्काराची घोषणा करत असताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की राम सुतार यांनी आपल्या शिल्पकलेतून महाराष्ट्राचा आणि देशाचा गौरव वाढवला आहे. त्यांच्या कलाकृती जगभरात भारताचे प्रतिनिधित्व करतात. महाराष्ट्र भूषण २०२४ साठी त्यांच्या नावाला सर्वानुमते मान्यता देण्यात आली आहे. हा पुरस्कार त्यांना लवकरच एका विशेष समारंभात प्रदान करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Innovation: गहू काडापासून नैसर्गिक स्ट्रॉ निर्मितीचा अभिनव प्रयोग

Ai Sprayer Technology: कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रावर आधारित फवारणी यंत्र

National Agri Market: बोलबाला राष्ट्रीय बाजारांचा!

Maharashtra Education Survey: ‘परख’चे सर्व्हेक्षण आशादायी

Maharashtra NCP Leadership: राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची निवड

SCROLL FOR NEXT