Agriculture GST Agrowon
ॲग्रो विशेष

GST Reduction on Agri Inputs : कृषी निविष्ठांवरील ‘जीएसटी’ माफ करा

Agriculture Inputs GST : कृषी निविष्ठांवर लावण्यात येणारा जीएसटी कमी करण्याची अपेक्षा राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Amaravati News : कृषी निविष्ठांवर लावण्यात येणारा जीएसटी कमी करण्याची अपेक्षा राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. कोणत्याच शेतीमालास हमीदर किंवा त्यापेक्षा अधिक भाव मिळत नसताना जीएसटीच्या भाराने शेतीवरील खर्च वाढला आहे. तो कमी करण्यासाठी राज्य सरकारने तरतुदी केल्या पाहिजे, अशा शेतकऱ्यांच्या भावना आहेत.

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ झाला असून, राज्याचे अंदाजपत्रक १० मार्चला सादर होणार आहे. या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांनी बऱ्याच अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. पेरणी ते शेतीमाल विक्रीपर्यंत लागणाऱ्या अनेक प्रकारच्या करांनी शेतकऱ्यांचे अर्थचक्र बिघडले आहे.

शेतीमाल उत्पादनासाठी लागणारा खर्च बाजारात मिळणाऱ्या कमी दरांमुळे भरून निघत नसल्याने कर्जाचा डोंगर वाढलेला आहे. एकंदरीतच शेतीमाल विकल्यानंतर नफा दिसत नसल्याने शेती हा तोट्याचा व्यवसाय झाल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे.

खते, कीटकनाशके, कृषियंत्र यासह शेतीसाठी आवश्यक इतर सर्व वस्तूंवर ५ ते २८ टक्क्यांपर्यंत जीएसटी लागू आहे. त्यामुळे पेरणी ते विक्री या प्रक्रियेपर्यंत खर्चाचा भार वाढला आहे.

उत्पादनासाठी शेतीच्या मशागतीपासून पेरणी, कापणी, मळणी व विक्री या सर्व प्रक्रियेत विविध कर लागतात. कृषी निविष्ठांवर असलेल्या जीएसटीमुळे उत्पादन खर्चात हेक्टरी १५ ते २० हजार रुपयांची वाढ झाली आहे. हा खर्च कमी केल्यास उत्पादनावरील खर्चात कपात होऊ शकणार असल्याने राज्य सरकारने जीएसटी कमी करावा, अशी मागणी समोर आली आहे.

...अशी आहे कर आकारणी (टक्के)

रासायनिक खते ः ५

सेंद्रीय खत ः १२

कीटकनाशके ः१८

तणनाशक ः १८

कृषियंत्र ः १२ ते १८

शेतीपंप ः १८

फवारणी पंप ः १२ ते १८

ठिबक सिंचन साहित्य ः १२

पीव्हीसी पाइप ः १२ ते १८

पेरणी ते काढणी व विक्री, या सर्व प्रक्रियेत शेतकऱ्यांना जवळचा पैसा खर्च करावा लागतो. बाजारात शेतीमालास भाव मिळत नाही. शासकीय खरेदीचा गोंधळ आहे. शेतीवरील खर्चाचा ताण कमी करायचा असेल तर सरकारने जीएसटी माफ करावा.
- राजेश पाटील, शेतकरी, साऊर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Road Committee: शेतरस्त्यांसाठी समिती स्थापन करणार : फडणवीस

Mahakrushi App: ‘महाकृषी’ ॲपमुळे कामकाजात पारदर्शकता

APMC Cess Scam: सेस चोरीप्रकरणी ‘पणन’ने अहवाल मागविला

Maize Production: राज्यात यंदा खरिपात मका क्षेत्र वाढीचा अंदाज

Raisin Illegal Import: चीनमधून बेदाण्यांची बेकायदा आयात थांबवा

SCROLL FOR NEXT