Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : खरीप पीकविम्यासाठी २ लाख १० हजार शेतकरी पात्र

Kharif Season Compensation : सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागच्या खरीप पीकविम्याची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढील आठवड्यापासून विम्याच्या रकमेचे वाटप होणार आहे.

Team Agrowon

Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागच्या खरीप पीकविम्याची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढील आठवड्यापासून विम्याच्या रकमेचे वाटप होणार आहे. जिल्ह्यातील २ लाख १० हजार ६६३ शेतकऱ्यांना ही भरपाई मिळणार असून, एकूण २८२ कोटी २० लाख रुपये इतकी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.

जिल्ह्यातील ७ लाख ३३ हजार ९५३ शेतकऱ्यांनी खरीप पीकविमा योजनेत भाग घेतला होता. जिल्ह्यात उत्तरापाठोपाठ हस्त नक्षत्राच्या पडलेल्या मोठ्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. पिकाच्या नुकसान भरपाईसाठी सुमारे सव्वा लाख शेतकऱ्यांनी पीकविमा कंपन्यांना नुकसानीची माहिती कळविली होती.

त्यानुसार बाधित शेतकऱ्यांच्या पिकांचे विमा कंपनीकडून पंचनामे करण्यात आले. पिकांचे नुकसान झालेल्यांमध्ये प्रामुख्याने बार्शी, अक्कलकोट, माढा, मंगळवेढा, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर या तालुक्यांचा समावेश आहे. सोयाबीन, उडीद, तूर, मका, बाजरी, खरीप ज्वारी या पिकांचे नुकसान झाले आहे.

खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र राज्य सरकारने त्यांच्या विषयाची विम्या हप्त्याची रक्कम न भरल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळू शकली नव्हती. मात्र काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने आपल्या हिश्श्याची रक्कम भरल्यामुळे शेतकऱ्यांना खरीप पीकविमा रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पुढील आठवड्यापासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम मिळण्यास सुरुवात होईल. तालुकानिहाय याचे वाटप होणार आहे.
-योगिराज निंबाळे, जिल्हा समन्वयक, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी, सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Maharashtra 2026 : दुष्काळाच्या स्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Maharashtra Cabinet Decisions: साखर कारखाने, ऊस शेतकऱ्यांना दिलासा; ७५० कोटींच्या सॉफ्ट लोन धोरणाला मंजुरी, मुख्यमंत्र्यांची माहिती

Dam Water Storage Update: यावल, रावेरातील प्रमुख सिंचन प्रकल्प भरले

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT