Agriculture Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation : कोनड प्रकल्पातून रब्बी पिकांसाठी दुसरेआवर्तन

Rabi Crop Irrigation : जाफराबाद तालुक्यातील कोनड बुद्रुकच्या लघू सिंचन प्रकल्पातून रब्बीसाठी दुसरे आवर्तन सोडण्यात आले आहे.

Team Agrowon

Jalna News : जाफराबाद तालुक्यातील कोनड बुद्रुकच्या लघू सिंचन प्रकल्पातून रब्बीसाठी दुसरे आवर्तन सोडण्यात आले आहे. यामुळे वरूड, कोनड शिवारातील ९१६ हेक्टर क्षेत्र भिजणार असून, रब्बी पिकांना फायदा होणार आहे.

परिसरात समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे कोनडच्या प्रकल्पात मुबलक पाणीसाठा असल्यामुळे रब्बी हंगामासाठी आवर्तन देणे शक्य झाले आहे. शेतकऱ्यांनी आवर्तने सुटण्याच्या अपेक्षेने ज्वारी, हरभरा पिकाची पेरणी मोठ्या प्रमाणात केली आहे.

दरम्यान, कालव्यात पाणी सुटल्याने परिसरातील पिके बहरायला सुरवात झाली आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी शेताला पाणीपुरवठा करीत असतानाच नासाडी होणार नाही, याचीही काळजी घ्यावी.

जेणेकरून गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी आगामी काळात काही अडचणी येणार नाही, अशी अपेक्षा परिसरातील ग्रामस्थ करीत आहेत.

आगामी काळात पिण्याच्या पाण्याची सुद्धा आवश्यकता असल्याने पाणी राखीव ठेवल्या जाते. त्यामुळे दरवर्षी फक्त दोन आवर्तने सोडण्यात येतात.
- कांचन खुरदे, कालवा निरीक्षक
पाऊस भरपूर प्रमाणात झाला; मात्र तो जोरात झाल्याने पाणी जमिनीत न मुरता, ओसंडून वाहून गेले. परिणामी विहिरीत पाणी कमी झाल्याने या आवर्तनाचा ज्वारी, गहू, मका, हरभरा, कांदे आदी पिकांना फायदा होत आहे.
- दीपक शिंदे, शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : एक लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांना विमा कवच नाही

Industrial Investment : औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा, सुविधा उपलब्ध करून देणार

Dairy Industry : सलग तीन महिने दूध संकलनात घट

Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

Finlay Mill Amravati : फिनले मिलसाठी हवा ४१ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT