MSP For Farmers Agrowon
ॲग्रो विशेष

MSP For Farmers: मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना दिलासा, मूग-उडीद खरेदीला सरकारी मंजुरी

Farmer Relief: बाजारात मूग आणि उडदाचे भाव हमीभावापेक्षा कमी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. सरकारने हमीभावाने खरेदी करावी यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलने केले होते. शेवटी सरकारने हमीभावाने मूग आणि उडीद खरेदीचा निर्णय घेतला.

Sainath Jadhav

News: बाजारात मूग आणि उडदाचे भाव हमीभावापेक्षा कमी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. सरकारने हमीभावाने खरेदी करावी यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलने केले होते. शेवटी सरकारने हमीभावाने मूग आणि उडीद खरेदीचा निर्णय घेतला. 19 जूनपासून खरेदीची सुरुवात होणार आहे, अशी माहिती मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव दिली.

मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठी घोषणा केली आहे. मूंग आणि उडीद या पिकांची खरेदी हमीभावावर केली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी त्यांच्या एक्स हँडलवर दिली आहे. यापूर्वी मूग आणि उडीदाची सरकारी खरेदी होत नसल्याने शेतकरी नाराज होते आणि त्यांनी सातत्याने हमीभावावर खरेदीची मागणी केली होती.

सरकारी खरेदीसाठी शेतकऱ्यांना आपली नोंदणी करावी लागेल. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सांगितले की, मूग खरेदीसाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे. याबाबत त्यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी चर्चा केली आहे. मूग खरेदीसाठी नोंदणी १९ जूनपासून सुरू होईल.

शेतकऱ्यांना होत होते नुकसान
यंदा मध्य प्रदेशात मूग खरेदीच्या मुद्द्यावर बराच गदारोळ झाला. हमीभावावर खरेदी न झाल्याने शेतकरी निराश झाले होते. बाजारात मूगाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते.

हमीभाव 8 हजार 682 इतका असूनसुद्धा बाजारात मूग फक्त 5 हजार रुपये प्रति क्विंटल दराने विकले जात होते ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत होता. शेतकरी संघटनांनी आणि शेतकऱ्यांनी सरकारी खरेदी सुरू करण्यासाठी आंदोलनेही केली होती. (उडदाचा हमीभाव-7 हजार 400)

माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनीही सरकारवर टोलवाटोलवी करत असल्याचा आरोप केला होता. आता सरकारने मूग आणि उडीदाची MSP वर खरेदी करण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Manikrao Kokate Controversy: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नव्या वक्तव्याने पुन्हा वाद; राजीनाम्याच्या मागणीला जोर

Khandesh Water Storage : भूगर्भातील पाणी उपसा घटला

Watermelon Farming : खरिपातील कलिंगडाची लागवड यंदा कमीच

MSP committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या हमीभाव समितीच्या नियमित बैठका; केंद्रीय कृषिमंत्र्यांचे उत्तर

Agrowon Podcast: पपईच्या दरात सुधारणा; कारली-मका तेजीत, कोथिंबीर स्थिर, तर तूर मात्र मंदीत

SCROLL FOR NEXT