Dangerous Villages Agrowon
ॲग्रो विशेष

Rehabilitation Villages : दरडप्रवण क्षेत्रातील गावांचे पुनर्वसन रखडलेलेच

Team Agrowon

Pune News : पुणे जिल्ह्यातील २३ गावे दरडप्रवण (धोकादायक) म्हणून निश्चित करण्यात आली आहेत. भूस्खलनाचा धोका असलेल्या मुळशी तालुक्यातील घुटके, भोर तालुक्यातील कोंढरी आणि धानवली या तीन गावांचे पूर्णतः पुनर्वसनाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडून राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे. मात्र, त्यावर मागील चार वर्षांपासून निर्णय झालेला नाही.

आंबेगाव तालुक्यातील माळीण गावात दरड कोसळून दीडशेपेक्षा जास्त नागरिकांना जीव गमवावा लागला होता. त्यानंतर जिल्ह्यातील तलाठी, ग्रामसेवकांकडून सर्वेक्षण करण्यात आले. त्यांनी ९५ गावे धोकादायक असल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला दिला. त्यानंतर भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडे आणि भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियातर्फे करण्यात आले.

याशिवाय ‘सीओईपी’ने या गावांत करायच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांचे अंदाजपत्रक तयार केले. त्यानुसार शासनाकडून तीन कोटी ६५ लाख २३ हजार रुपयांचा निधी आला. यातून पाच गावांत सीमाभिंत उभारणे, चर काढणे, गॅबियन वॉल उभारण्यात आली. दोन गावांत सुरक्षाविषयक उपाययोजनांची गरज नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितले. २३ पैकी तीन गावांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याची गरज असल्याचे समोर आले.

‘जीएसआय’च्या अहवालानुसार तीन गावांतील नागरिकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला. त्यात शासनाने काही त्रुटी काढल्या होत्या. त्या दूर करून पुन्हा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

म्हणून पुनर्वसन आवश्यक

भोर तालुक्यातील दोन्ही गावांच्या भौगोलिक परिस्थितीनुसार ही गावे डोंगराळ असून येथील जमिनीचा पृष्ठभाग खडकाळ आणि कठीण नसून लाल मातीचा आहे. तसेच पावसाळ्यात संततधार किंवा अतिवृष्टी होत असते. मुळशीतील घुटके गावाची स्थितीही अशीच आहे. त्यामुळे या गावांचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे.

या गावांतील पावसाचे प्रमाण

घुटके गावात वार्षिक

सरासरी ७,५०० मिमी

कोंढरी गावात वार्षिक सरासरी ८,००० मिमी

धानवली गावात वार्षिक सरासरी ७,००० मिमी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT