PM Surya Ghar Yojana Agrowon
ॲग्रो विशेष

PM Surya Ghar Yojana : घराच्या छतावर सोलर पॅनल! मोफत वीज योजनेसाठी नोंदणी सुरू

PM Surya Ghar Yojana Subsidy : पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेंतर्गत देशातील १ कोटी कुटुंबांना याचा थेट लाभ होणार आहे. यासाठी अनुदान दिले जाणार असून मोफत वीज योजनेसाठी नोंदणी सुरू झाली आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : पंतप्रधान मोदी यांनी १३ फेब्रुवारी रोजी 'पीएम-सूर्य घर: मोफत वीज योजने'ची घोषणा महाराष्ट्रातील यवतमाळ येथील दौऱ्यात केली होती. या योजनेंतर्गत १ कोटी कुटुंबांनांच्या घरांच्या छतावर सौर ऊर्जा संयंत्रे बसविण्यात येणार आहेत. तर आता या योजनेच्या नोंदणीस प्रत्यक्ष सुरूवात करण्यात आली आहे. या मोफत वीज योजनेंतर्गत लाभार्थ्यांना ३०० युनिटपर्यंत मोफत विजेचा लाभ दिला जाणार आहे. या योजनेंतर्गत घराच्या छतावर सोलर पॅनल बसविण्यासाठी केंद्र सरकार ७५००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार  असून लाभार्थ्यांना अनुदानही देणार आहे.

केंद्र सरकार पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेंतर्गत घरावर सौर पॅनेल बसवल्यानंतरच अनुदान देणार आहे. मात्र आपल्याला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आधी नोंदणी करणे गरजेचे आहे. जी आता सुरू झाली आहे. या योजनेसाठी पोष्ट ऑफिसमध्ये नोंदणी करू शकतात. तसेच सबसिडीबद्दलही माहिती मिळवू शकता. 

दरम्यान कर्नाटक पोस्टल सर्कलमध्ये प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत नोंदणी सुरू करण्यात आली आहे. तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिस, ग्राम डाक सेवक कार्यालय येथे नोंदणी करू शकतात.

ऑनलाइन नोंदणी 

पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेच्या अनुदान मिळवण्यासाठी सध्या नोंदणी कर्नाटक पोस्टल सर्कलमध्ये सुरू झाली आहे. पण या योजनेसाठी आपण ऑनलाइन अर्ज करू शकता. यासाठी https://pmsuryaghar.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जावून नोंदणी करता येईल. 

ऑनलाइन नोंदणी करण्याची पद्धत

१) सगळयात आधी अधिकृत वेबसाइट https://pmsuryaghar.gov.in वर जा आणि रुफटॉप सोलर याची निवड करा

२) यानंतर तुमचे राज्य आणि वीज वितरण कंपनीचे नाव निवडा. त्यानंतर वीज ग्राहक क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि ईमेल टाका.

३) नवीन पेजवर ग्राहक क्रमांक आणि मोबाईल टाकून लॉगिन करा.

४) फॉर्म उघडल्यावर, त्यामध्ये दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार रूफटॉप सोलर पॅनेलसाठी अर्ज करा.

५) हा अर्ज पुर्ण भरल्यावर व्यवहार्यता मंजूरी मिळेल, यानंतर तुम्ही नोंदणीकृत कोणत्याही विक्रेत्याकडून प्लांट बसवू शकता

किती सबसिडी?

या योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी, मागील सहा महिन्यांचे वीज बिल असणे अनिवार्य आहे. केंद्र सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे ग्राहकांना तीन किलोवॅटपर्यंतच्या कनेक्शनसाठी प्रति किलोवॅट रुपये ३०,००० आणि ३ किलोवॅटपेक्षा जास्त कनेक्शनसाठी १८,००० रुपये प्रति किलोवॅट अनुदान दिले जाऊ शकते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT