Animal Care  Agrowon
ॲग्रो विशेष

Animal Care : जनावरांना लावणार रिफ्लेक्टिव्ह बेल्ट

Animal Health News : या उपक्रमाची माहिती विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मो. युसुफ मो. समिर यांच्याकडून जाणून घेतली.

Team Agrowon

Wardha News : मोकाट जनावरांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने ॲप विकसित करून ॲपच्या आधारे जिओ टॅगिंग करून महामार्ग परिसरातील गावात जनावरांना रिफ्लेक्टिव्ह बेल्ट लावण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाची माहिती विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मो. युसुफ मो. समिर यांच्याकडून जाणून घेतली.

या वेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन आदी उपस्थित होते. जिल्ह्यात या उपक्रमामुळे वाहनचालक आणि स्वतः प्राणी दोघांचेही रक्षण होईल. प्राण्यांना रिफ्लेक्टिव्ह बेल्टने सुसज्ज करून, विशेषत: कमी प्रकाशाच्या परिस्थितीत किंवा रात्रीच्या वेळी टक्कर होण्याच्या घटना लक्षणीयरित्या कमी होईल.

असाच उपक्रम इतर जिल्ह्यानी सुद्धा राबविल्यास जनावरांमुळे होणारे अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असे विजयलक्ष्मी बिदरी यांनी सांगितले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनात जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेतून परिवहन विभागामार्फत ५ हजार ५०० रिफ्लेक्टिव्ह बेल्ट लावण्याचा उपक्रम राबविण्यात येत असून स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून महामार्गावरील गावपरिसरातील जनावरांना रिफ्लेक्टिव्ह बेल्ट लावण्यात येत आहे.

केवळ दृश्यमानता वाढवण्यासाठी नाही तर त्याच्या अंमलबजावणीमध्ये पारदर्शकता आणि परिणामकारकता देखील आहे. प्रत्येक प्राण्याला जिओ-टॅग केले जाईल आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी आणि उपक्रमाच्या प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी ॲपद्वारे सर्वसमावेशक फोटो घेतले जात आहे.

अपघात टाळता येणार

गुरांचे रस्त्यावर येणे थांबविणे शक्य नसले तरी रिफ्लेक्टिव्ह बेल्ट लावून त्यांच्यामुळे होणारे अपघात टाळता येणार आहेत. नागरिकांनी शहरातील भागात मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्रे तसेच गुरे दिसल्यास पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT