Team Agrowon
जनावरांच्या शरीराला लवचिकता पाण्यामुळे येते. पचनक्रियेत अन्नघटक विरघळून ते संपूर्ण शरीरात पुरवले जातात. पाण्यामुळे जनावरांच्या शरीराचे तापमान स्थिर राहण्यास मदत होते.
शरीरातील टाकाऊ व विषारी घटकपदार्थ शरीराबाहेर मूत्र आणि घामाद्वारे टाकण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते.
मूत्रपिंड व मूत्राशयावर परिणाम होतो. दूध देण्याचे प्रमाण १० ते २० टक्क्यांनी घटते.
नेहमी स्वच्छ व मुबलक पिण्याचे पाणी द्यावे. दिवसातून कमीत कमी तीन वेळेस पाणी पाजावे. जनावर गाभण असेल तर दिवसातून ४ ते ५ वेळेस पाणी पाजावे.
पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता ही पाण्याचा रंग, चव,वास, तापमान, पाण्यातील गढूळपणा, पाण्याचा सामू व त्यात मिसळलेले क्षार, जैविक तत्त्वे, जिवाणू इ. वर अवलंबून असते.
गाभण जनावरांना देण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये जैविक तत्त्वे, क्षार, धातूचे कण प्रमाणापेक्षा जास्त नसावेत.
जनावरांना पाण्याची आवश्यकता ही त्यांचा आहार, जात, गर्भावस्था, वातावरणातील तापमान, आरोग्य तसेच दूध उत्पादनावर अवलंबून असते.
दुभत्या जनावरांना दिवसातून कमीत कमी चार वेळेस पाणी पाजले तर दूध उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ होते.