Fruit Market Rate
Fruit Market Rate agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Market Rate : कोथिंबीरच्या दरात घट; फळभाज्यांचे दर वाढले, आठवडी बाजारात भाजीपाल्यांची आवक वाढली

sandeep Shirguppe

Kolhapur Bhajipala Market : मागच्या काही दिवसात पाऊस चांगला झाल्याने आठवडा बाजारात भाजीपाल्यांची आवक वाढत आहे. कोंथिबीरची स्थानिक आवक सुरू झाल्याचे दरात कमालीची घट झाली आहे. बाजारात अभावाने दिसणारी शेपूची भाजी विक्रीस येत आहे. फळभाज्यांचे वाढीव दर मात्र काहीसे जैसे थे आहेत.

अननसची आवक जोमात असून लाल ड्रॅगनचीही आवक चांगली आहे. तर कोकणातून फणसाची आवक थोडी मंदावली आहे. ओल्या खजुराची आवक पुन्हा वाढली आहे. वसई केळीचे दर कमी झाले, मात्र देशी केळीची दर अद्याप चढेच आहेत. मागणी असूनही चिकू, पेरू आदी फळांचा तुटवडा आहे.

परराज्यातून विविध प्रजातीचा आंबा बाजारपेठेत दाखल झाल्याने किलोवर विक्री होत आहे. मागणी वाढल्याने फूलबाजारही तेजीत आला आहे. झेंडू, गुलाब, निशिगंधाच्या फुलांना मागणी अधिक आहे. खाद्य तेल बाजारात दर प्रतिकिलो २ ते ३ रुपयांनी चढ उतार होतानाचे चित्र आहे.

भाजीपाल्याचे प्रतिकिलोचे दर

टोमॅटो- ५० ते ६० रुपये, दोडका- ६० ते ८०, वांगी - ७० ते ८०, कारली- ५० ते ६०, ढोबळी मिरची- ६० ते ८०, मिरची - ६० ते , फ्लॉवर - ५० ते ६०, कोबी- ३० ते ४०, बटाटा- ४० ते ५०, कांदा - ३५ ते ४०, लसूण- २०० ते २५०, आले- १२० ते १४०, लिंबू - १५० ते ४०० शेकडा, गाजर - ५० ते ६०, बीन्स- १६० ते २००, गवार - ८० ते १००, भेंडी ५० ते ६०, काकडी- ५० ते ६०, दुधी - ३० ते ४० पालेभाज्या - २० ते २५, कोथिंबीर - २० ते २५, मेथी - ३०, शेवगा - ८ ते १० रुपये नग

फुले : झेंडू - १५० ते १६०, निशिगंध - १२० ते १५०,१८० गुलाब - १८० ते २०० , गलांडा - १२० ते १५०, शेवंती - १६०, १८० ते २००

फळे : सफरचंद - २५० ते ४००, संत्री - १२० ते १३०, मोसंबी- १०० ते १२०, डाळिंब- १२० ते २००, चिकू- १०० ते १२०, पेरु- ५० ते ८०, खजूर -१५० ते २००, पपई- ४० ते ५०, मोर आवळा -१०० ते १२०, सीताफळ - ८० ते १००, कलिंगड - ५० ते ६०, टरबूज -४० ते ६०, केळी - ५० ते ६० डझन, देशी केळी - ९० ते १०० डझन, किवी - १४० ते १५०, चिंच- १०० ते १४०, अननस -४० ते ५०, अंजीर -८० ते१००.

खाद्यतेल : सरकी - १०८ ते ११२ , शेंगतेल - १७४ ते १८०, सोयाबीन - १०८ ते ११२, पामतेल - १०८ ते ११४ , सूर्यफूल - १०८ ते ११२ .

कडधान्य : हायब्रीड ज्वारी- २८ ते ३५, बार्शी शाळू- ३० ते ५३, गहू - ३३ ते ४२, हरभराडाळ - ८३ ते ८६, तुरडाळ- १६० ते १७८, मुगडाळ - ११५ ते १२०, मसूरडाळ - ८२ ते ९०, उडीदडाळ- १३० ते १४०, हरभरा- ७५ ते ७८, मूग- १२० ते १४०, मटकी- ११० ते १२०, मसुर- ७० ते ९० फुटाणाडाळ - ८३ ते ८५, चवळी- ११० ते १४०, हिरवा वाटाणा- ९० ते १००, छोला -१४० ते १६०.

पावसाने हंगाम बहरला

जूनच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने सुरुवात केली. मात्र पाऊस उसंत घेत असल्याने भाजीपाल्याच्या आवकवर परिणाम झाला. आता पावसाने जोर धरल्याने हंगामी भाजीपाला बाजारात येऊ लागला आहे. यामुळे बाजारातील हंगामही बहरला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur ZP : कोल्हापूर जिल्हा पशुसंवर्धन विभागात ७३ पदे रिक्त, पशुधनाच्या पर्यायाने शेतकरी अडचणीत

Wild Animal Crop Damage : खानदेशात पिकांत वन्यप्राण्यांचा धुमाकूळ

Tur Cultivation : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Ladki Bahin Yojana : अंगणवाडी सेविका, ग्रामसेवकांकडे ‘लाडकी बहीण योजने’साठी अर्ज करा

Ambadas Danve Suspension : अंबादास दानवेंना शिवीगाळ भोवली; दानवेंवर निलंबनाची कारवाई

SCROLL FOR NEXT