Teacher  Agrowon
ॲग्रो विशेष

Palghar Teacher Bharti 2023 : पालघरमध्ये ‘पेसा’मुळे १६०० शिक्षकांची भरती

Palghar Teacher Recruitment 2023 : पालघर जिल्ह्यातील शेकडो शाळांमध्ये शिक्षकांचा तुटवडा भासत आहे. अनेक शाळांमध्ये एकच शिक्षक कार्यरत असल्याने त्यांच्यावर तीन ते चार वर्गांचा भार पडत आहे. २०२२-२३ च्या आधारबेस संच मान्यतेनुसार जिल्ह्यात शिक्षकांची ७,१०८ पदे मंजूर असून त्यापैकी ४,९३० शिक्षक कार्यरत आहेत

Team Agrowon

Palghar Teachers Bharti : पालघर जिल्ह्यातील अनेक शिक्षकांची पदे रिक्त असल्याने शिक्षण व्यवस्थेचे वाभाडे निघाले आहेत. अशातच अनुसूचित जमाती-पेसा क्षेत्रातील शिक्षक पदभरतीबाबत वित्त विभागाकडून, रिक्त पदांच्या सुमारे ८० टक्के जागा भरण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील २,१७८ रिक्त पदांपैकी तब्बल १६०० स्थानिक शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे.

पालघर जिल्ह्यातील शेकडो शाळांमध्ये शिक्षकांचा तुटवडा भासत आहे. २०२२-२३ च्या आधारबेस संच मान्यतेनुसार जिल्ह्यात शिक्षकांची ७१०८ पदे मंजूर असून त्यापैकी ४९३० शिक्षक कार्यरत आहेत. एकाच वेळी अनेक विद्यार्थ्यांना शिकवताना शिक्षकांची तारांबळ उडत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून पालकांसह लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी आंदोलन केले आहे.

शिक्षक संघटनांकडूनही प्रशासकीय कामकाजावर ताशेरे ओढण्यात आले होते. याची जिल्हा प्रशासनाकडून दखल घेण्यात आली. या प्रकरणी राज्य सरकारने शिक्षकांची त्वरित नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली होती.

टीएआयटी २०२२ परीक्षा दिलेल्या उमेदवारांमधून शैक्षणिक आणि व्यावसायिक गुणवत्तेनुसार उमेदवारांची जिल्ह्यातील पेसा क्षेत्रात नियुक्तीचे निर्देश दिले आहेत. परवानगी दिलेल्या रिक्त पदांच्या मर्यादेत नियुक्तीची कार्यवाही करण्याचे आदेश शिक्षण आयुक्त, आयुक्तालय, पुणे यांनी जिल्हा परिषदेला दिले आहेत. त्यानुसार एका आठवड्याच्या आत नियुक्ती पत्रे देण्यात यावीत, असे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी आदेश दिले आहेत.

पेसा क्षेत्रात १६०० शिक्षकांची भरती होणार असून, सर्वप्रथम दुर्गम भागातील शून्य शिक्षकी शाळा, त्यानंतर एक शिक्षकी आणि कमी शिक्षक असलेल्या शाळांमध्ये प्राधान्यानुसार भरती केली जाईल. स्थानिक शिक्षक असल्याने जिल्हा बदलीमुळे जागा रिक्त होणार नाहीत.
प्रकाश निकम, अध्यक्ष, पालघर जिल्हा परिषद

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladaki Bahin Yojana : महिलांच्या बँक खात्यावर दर महिन्याला १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये जमा होणार का?

Nanded Assembly Constituency : नांदेडमध्ये तीन नवख्यांना मिळाली आमदारकीची संधी

Agrowon Podcast : मका दरात काहिशी सुधारणा

Parliament Winter Session : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांचा गदारोळ; लोकसभेसह राज्यसभेचं कामकाज २७ नोव्हेंबरपर्यंत तहकूब

Land Record Registration : गुंता इतर हक्क नोंदीचा

SCROLL FOR NEXT