Sangli Politics agrowon
ॲग्रो विशेष

Sangli Politics : सांगलीत बंडखोरांची मनधरणी, काँग्रेस, भाजपमध्ये हालचालींना वेग

Congress and BJP Sangli Politics : जतमधून तम्मनगौडा रवी-पाटील आणि सांगलीतून शिवाजी डोंगरे यांचे बंड रोखण्यासाठी भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांच्याकडून बंडखोरांची मनधरणी सुरू आहे.

sandeep Shirguppe

Assembly Election Sangli : सांगली जिल्ह्यात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दोन्ही गटाच्या इच्छूक नेत्यांनी बंडखोरीचे अस्त्र बाहेर काढल्याने काँग्रेस आणि भाजपकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. सांगली व मिरज मतदारसंघांतील काँग्रेसचे बंड रोखण्याची जबाबदारी पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यावर सोपविली आहे. त्यासाठी चेन्नीथला शनिवारी (ता. २) सांगलीत येणार आहेत. तर भाजपचे शिराळ्यातील बंडखोर सम्राट महाडिक यांनाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने मुंबईला बोलावून घेतले आहे.

जतमधून तम्मनगौडा रवी-पाटील आणि सांगलीतून शिवाजी डोंगरे यांचे बंड रोखण्यासाठी भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांच्याकडून बंडखोरांची मनधरणी सुरू आहे.

सांगलीत काँग्रेसपुढे सर्वांत मोठे आव्हान वसंतदादा घराण्यातील असलेल्या माजी आमदार मदन पाटील यांच्या पत्नी श्रीमती जयश्री पाटील यांच्या बंडखोरीचे आहे. त्यांनी माघार घ्यावी, यासाठी काही महत्त्वाच्या ऑफर त्यांना काँग्रेसने याआधी दिल्या आहेत. त्यात विधान परिषदेची आमदारकी, जिल्हा बँकेचे अध्यक्षपद आणि महापालिकेचे नेतृत्व हे तीन महत्त्वाचे विषय आहेत.

विधान परिषदेचा शब्द हा पूर्णत्वाला जाईल का, ही शंका बंडखोरांना असते. त्याबाबतचा शब्द स्वतः चेन्नीथला यांनी दिला, तर श्रीमती जयश्री पाटील या विश्वासाने चर्चा करतील, अशा अपेक्षा काँग्रेस नेत्यांना आहे. त्यामुळे शनिवारी (ता. २) श्री. चेन्नीथला सांगलीला येणार आहेत. आमदार विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील त्यांच्यासोबत असतील. ते मिरजेतील उमेदवार मोहन वनखंडे यांनी माघार घ्यावी, यासाठीही प्रयत्न करणार आहेत.

भाजपने बंडखोरांच्या माघारीसाठी हालचाली गतिमान केल्या आहेत. आज देवेंद्र फडणवीस यांनी सम्राट महाडिक, शिवाजी डोंगरे आणि तम्मनगौडा रवी-पाटील यांना मुंबईला पाचारण केले होते. त्यासाठी कोल्हापुरातून स्वतंत्र विमान बुक केले होते. पैकी फक्त श्री. महाडिक सागर बंगल्यावर पोहोचले. श्री. डोंगरे आणि श्री. रवी-पाटील यांनी त्यांच्या भेटीचा प्रस्ताव डावलला.

जतमध्ये माजी आमदार विलासराव जगताप यांनी रवी-पाटील यांनी माघार घेतल्यास आमच्याकडे पर्याय आहेत, असे सांगून भाजपची कोंडी केली. श्री. डोंगरे यांनी ‘मी भाजपच्या कोणत्याही मोहाच्या प्रस्तावाला बळी पडणार नाही. यावेळी लढणार आहे’, असा निरोप पाठवला. त्यांच्यासोबत सध्या मंत्री चंद्रकांत पाटील आणि शेखर इनामदार चर्चा करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT