Solapur Zilha Bank  Agrowon
ॲग्रो विशेष

Solapur Zilha Bank : ‘ओटीएस’मधून थकबाकीदार शेतकऱ्यांची पुन्हा पत निर्मिती

Solapur District Central Cooperative Bank : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आजपर्यंत शेतकरी केंद्रबिंदू मानून काम केले आहे. आम्ही शेतकऱ्यांना प्राधान्य देत आहोत. दुष्काळासह इतर कारणांमुळे शेतकऱ्यांकडे जवळपास ७०० कोटी रुपये थकीत आहेत.

Team Agrowon

Solapur News : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आजपर्यंत शेतकरी केंद्रबिंदू मानून काम केले आहे. आम्ही शेतकऱ्यांना प्राधान्य देत आहोत. दुष्काळासह इतर कारणांमुळे शेतकऱ्यांकडे जवळपास ७०० कोटी रुपये थकीत आहेत.

थकबाकीदार शेतकऱ्यांना नियमित कर्जदार करून त्याची पत पुन्हा निर्माण करण्यासाठी एक रकमी परतफेड योजना (ओटीएस) जाहीर केली आहे.

या योजनेसाठी जिल्ह्यातील २८ हजार ३९ शेतकरी पात्र आहेत. त्यापैकी ४ हजार २३३ शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती बँकेचे प्रशासक कुंदन भोळे यांनी दिली.

सकाळच्या कार्यालयात प्रशासक भोळे यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. निवासी संपादक अभय दिवाणजी यांनी त्यांचे स्वागत केले.

प्रशासक भोळे म्हणाले, बँक सुस्थितीत आणण्यासाठी थकीत असलेले शेती व बिगर शेती कर्ज वसुली हा महत्त्वाचा पर्याय आहे. त्यासाठी आम्ही विविध पातळीवर काम करत आहोत. शेतकऱ्यांकडील कर्ज वसुली करून त्यांना पुन्हा कर्ज वाटप करण्यासाठी ओटीएस योजना महत्त्वपूर्ण ठरत आहे.

या योजनेसाठी जिल्ह्यातील २८ हजार ३९ शेतकरी पात्र असून त्यापैकी ४ हजार ३२८ शेतकऱ्यांनी या योजनेतून प्रस्ताव सादर केले आहेत. त्यापैकी ४ हजार २३३ शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले आहेत.

या योजनेमुळे ११५ कोटी १३ लाख रुपयांची शेती कर्जाची वसुली झाली आहे. या योजनेत सहभाग घेतल्यामुळे शेतकऱ्यांना २० कोटी ६४ लाख रुपयांची सूट मिळाली आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेबद्दल या जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये वेगळी आत्मीयता आहे. ही बँक आपली असल्याची त्यांची भावना आहे.

या बँकेच्या माध्यमातून शेतकरी, ग्राहक, सभासद यांना इतर स्पर्धक बँकांप्रमाणे सुलभ व जलद सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. या सेवा देण्यासाठी आवश्‍यक असलेल्या बाबींची उपाययोजना आम्ही करत असल्याचेही भोळे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT