Fertilizer  Agrowon
ॲग्रो विशेष

Fertilizer Shortage : पालघर जिल्ह्यात खतांचा तुटवडा

Kharif Season 2025 : खरीपातील पेरणीच्या काळात खतपुरवठ्यावर परिणाम झाल्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे.

Team Agrowon

Palghar News : आरसीएफच्या चेंबूर येथील कारखान्यातून खताची उत्पादन प्रक्रिया बंद झाल्यामुळे पालघर जिल्ह्यात खतांच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. खरीपातील पेरणीच्या काळात खतपुरवठ्यावर परिणाम झाल्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे.

जिल्ह्यातील मोठे वितरक लहान वितरकांना खत उपलब्ध करून देत नसल्याने कृषी सेवा केंद्रांवर भात बियाणे खरेदी करणाऱ्यांनाच खत उपलब्ध करून दिले जात आहे. खताचा पुरवठा मर्यादित झाल्यामुळे साठेबाजीची शक्यता आहे.

पालघर जिल्ह्यातील लहान वितरक असलेल्या कृषी सेवा केंद्राची मागणी आरसीएफ कंपनीच्या प्रतिनिधीमार्फत स्वीकारली जात नसल्याची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर कृषी सेवा केंद्राच्या मालकाने दिली. बफर स्टॉकमधील खत उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

आरसीएफचा चेंबूर येथील युरिया व संमिश्र खत निर्मितीचा कारखाना तांत्रिक बिघाडामुळे बंद आहे. त्याचा उत्पादनावर परिणाम झाल्याने आरसीएफकडून राज्यभरात होणाऱ्या खतपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. खताअभावी पेरणी केलेल्या पिकांची वाढ बाधित होण्याची भीती आहे.

खतपुरवठ्याची मागणी

आरसीएफ कंपनीच्या रायगड जिल्ह्यातील थळ येथील कारखान्यातून खतपुरवठा सुरू करण्याची मागणी पालघर जिल्ह्यातील शेतकरी आणि कृषी सेवा केंद्रचालकांकडून केली जात आहे. चेंबूर येथील कारखान्यात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे उत्पादन प्रक्रिया बंद झाली होती; परंतु दुरुस्तीच्या कामानंतर कारखान्यात उत्पादन प्रक्रिया सुरू झाली आहे; परंतु खतपुरवठा योग्य रीतीने केला जात असल्याची माहिती आरसीएफचे प्रतिनिधी गोवेकर यांनी दिली.

पालघरसाठी जूनसाठी मंजूर असलेला खताचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. युरिया खताची मागणी पेरणीच्या काळात अधिक असते. जिल्ह्यात खतपुरवठा झालेला आहे, साठेबाजी होणार नाही, तसेच शेतकऱ्यांना खत उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना केल्या जातील.
- सोमनाथ पिंजारी, जिल्हा कृषी अधिकारी, पालघर जिल्हा परिषद

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Prediction: पूर्व विदर्भात ५ दिवस पावसाचा अंदाज; उद्यापासून राज्यात पावसाचे वातावणर निवळण्याची शक्यता

Unseasonal Rain Crisis: वादळी पावसाचा तिसऱ्यांदा तडाखा

Turmeric Harvest Management: हळद काढणी पश्चात व्यवस्थापनावर मार्गदर्शन

Farmer Compensation Maharashtra : राज्यात २ लाख ४ हजार हेक्टर शेतीपिकांचं नुकसान; शेतकऱ्यांना लवकरात-लवकर मदत देणार, कृषिमंत्री भरणे यांची ग्वाही

Fertilizer Stock Approved: अकोला जिल्ह्यासाठी १.१४ लाख टन खत मंजूर

SCROLL FOR NEXT