One District One Product Award Agrowon
ॲग्रो विशेष

One District One Product Award : ‘वन डिस्ट्रिक वन प्रॉडक्ट ॲवॉर्ड’मध्ये रत्नागिरीचा समावेश

District Achievement : केंद्र शासनाच्या ‘वन डिस्ट्रिक वन प्रॉडक्ट ॲवॉर्ड २०२३-२४’ साठी देशातील ६० जिल्ह्यांच्या नामांकनामध्ये आणि राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये रत्नागिरीचा समावेश झाला आहे.

Team Agrowon

Ratnagiri News : केंद्र शासनाच्या ‘वन डिस्ट्रिक वन प्रॉडक्ट ॲवॉर्ड २०२३-२४’ साठी देशातील ६० जिल्ह्यांच्या नामांकनामध्ये आणि राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये रत्नागिरीचा समावेश झाला आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या इन्व्हेस्ट इंडियाचे सहायक व्यवस्थापक ताशी दोरजे शेर्पा यांनी नुकतीच या बाबत बैठक घेतली. रत्नागिरी जिल्हा हापूस आंबा उत्पादनात देशात एक ब्रॅण्ड तयार झाला आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी संगणकीय सादरीकरण करून सविस्तर माहिती दिली. जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, की आंब्याबरोबरच काजू, नारळ, कोकम आणि मासे ही जिल्ह्याची उत्पादने आहेत. २०१८ मध्ये हापूस आंब्याला जीआय टॅग मिळाला आहे.

राज्यात १६२.०८ हजार हेक्टर क्षेत्रात आंबा क्षेत्र आहे. त्यातून ४६३.१७ हजार टन आंबा उत्पादन होते. हेच प्रमाण कोकण विभागात १२६.४१ हजार हेक्टर लागवड क्षेत्रामध्ये २१३.३७ हजार टन आंबा उत्पादन होतो. तर एकट्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ६७.७९ हजार हेक्टर क्षेत्रामध्ये आंब्याची लागवड आहे. त्यामधून १२३.०६ हजार टन आंबा उत्पादन होतो.

२०२२-२३ ला कोकण विभागात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ६७ हजार ७९६ हेक्टर क्षेत्रामध्ये आंब्याची लागवड करण्यात आली आहे. त्यामधून १ लाख २३ हजार ६८ मे. टन आंबा उत्पादन घेऊन, रत्नागिरी प्रथम क्रमांकावर राहिला आहे. २०२२-२३ आणि २०२३-२४ वर्षासाठी रत्नागिरी जिल्ह्यामधून आंबा निर्यात करून अनुक्रमे १४५.९८ लाख व २५०.८६ लाख इतके उत्पन्न मिळाले आहे.

हापूस आंब्याची सर्वाधिक आयात करणारे देश कुवेत, संयुक्त अरब अमिराती, युनायटेड किंग्डम, कतार, ओमान, युनायटेड स्टेटस ऑफ अमेरिका, बहरीन आणि कॅनडा आहेत. या प्रसंगी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या इन्व्हेस्ट इंडियाचे सहायक व्यवस्थापक श्री. शेर्पा यांनी समाधान व्यक्त केले.

ते म्हणाले, की देशातील ६० जिल्ह्यांतील आणि राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश आहे. क्यूआर कोड, मोबाइल कुलिंग युनिट यासारखी चांगली कामगिरी आणि खूप चांगले काम तुम्ही सर्वांनी केले आहे. हापूस आंब्याच्या संदर्भात रत्नागिरी हा एक देशात ब्रॅण्ड झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion export India : कांद्याचे १५०, द्राक्षाचे ३०० कंटेनर अडकले; इराण आणि इस्रायल-अमेरिकेतील युद्धामुळे निर्यात ठप्प, शेतकरी व व्यापाऱ्यांना फटका

Gharkul Yojana: राज्यात एका वर्षात जवळपास ४ लाख घरकुले पूर्ण, हा आजपर्यंतचा विक्रम- जयकुमार गोरे

Poultry Farming: मुसळवाडीत कुक्कुटपालन प्रशिक्षण कार्यक्रमाला महिलांचा प्रतिसाद

Farm Loan Waiver: थकबाकीदार शेतकऱ्यांना मोठा दिलासा, कर्जमाफीबाबत कृषिमंत्री भरणेंची महत्त्वाची माहिती

Akot APMC: ‘एसआयटी’ चौकशीमुळे सहकार क्षेत्रात खळबळ

SCROLL FOR NEXT