Ratnagiri Hapus agrowon
ॲग्रो विशेष

Ratnagiri Hapus : हापूस उत्पादनात रत्नागिरी जिल्हा देशात पहिल्या क्रमांकावर

Ratnagiri Alphonso : केंद्र शासनाच्या ‘वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट ॲवॉर्ड २०२३-२४’ साठी देशातील ६० जिल्ह्यांना नामांकन मिळाले. यात राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यासह १४ जिल्ह्यांचा समावेश आहे.

sandeep Shirguppe

Alphonso Ratnagiri Market : केंद्र शासनाच्या ‘वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट ॲवॉर्ड २०२३-२४’ साठी देशातील ६० जिल्ह्यांना नामांकन मिळाले. यात राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यासह १४ जिल्ह्यांचा समावेश आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या इन्व्हेस्ट इंडियाचे सहायक व्यवस्थापक ताशी दोरजे शेर्पा यांनी गुरूवारी (ता.२६) याबाबत बैठक घेतली. शिवाय पडताळणीही केली. जिल्ह्याने केलेल्या कामगिरीमुळे रत्नागिरी जिल्हा हापूस आंबा उत्पादनात देशात एक ब्रँड झाला आहे, असे शेर्पा यांनी सांगितले.

तसेच जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनीही माहिती दिली. "आंब्याबरोबरच काजू, नारळ, कोकम आणि मासे ही रत्नागिरी जिल्ह्याची उत्पादने आहेत. २०१८ ला हापूस आंब्याला जीआय टॅग मिळाला आहे. राज्यामध्ये १६२.०८ हजार हेक्टर क्षेत्रामध्ये आंबा क्षेत्र आहे. त्यातून ४६३.१७ हजार टन आंबा उत्पादन होते. हेच प्रमाण कोकण विभागात १२६.४१ हजार हेक्टर लागवड क्षेत्रामध्ये २१३.३७ हजार टन आंबा उत्पादन होतो. एकट्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ६७.७९ हजार हेक्टर क्षेत्रामध्ये आंब्याची लागवड आहे. त्यातून १२३.०६ हजार टन आंबा उत्पादन होते." अशी माहिती सिंह यांनी दिली.

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या इन्व्हेस्ट इंडियाचे सहायक व्यवस्थापक शेर्पा म्हणाले, "देशातील ६० जिल्ह्यांतील आणि राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश आहे. क्यू आर कोड, मोबाईल कुलिंग युनिट यांसारखी चांगली कामगिरी आणि खूप चांगले काम तुम्ही सर्वांनी केले आहे. हापूस आंब्याच्या संदर्भात रत्नागिरी हा एक देशात ब्रँड झाला आहे." असे शेर्पा यांनी सांगितलं

हापूसची सर्वाधिक आयात करणारे देश

कुवेत, संयुक्त अरब अमिराती, युनायटेड किंग्डम, कतार, ओमान, युनायटेड स्टेटस ऑफ अमेरिका, बहरिन आणि कॅनडा या देशात मोठ्या प्रमाणात हापूसची मागणी होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

MIDC Long March : एमआयडीसीविरोधात वर्णे ते सातारा ‘लाँग मार्च’

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

SCROLL FOR NEXT