Highway Agrowon
ॲग्रो विशेष

Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गप्रश्‍नी अंकलीत बुधवारी ‘रास्ता रोको’

Land Acquisition : दोन दिवसांपूर्वी नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तिपीठ महामार्गास सांगली जिल्ह्यापर्यंत समर्थन आहे, असे जाहीर केले होते.

Team Agrowon

Sangli News : शक्तिपीठ महामार्ग रद्द करा आणि समर्थन करणाऱ्या शेतकऱ्यांना मोबदला किती देणार, हे सरकारने जाहीर करावे, या मागणीसाठी येत्या १८ डिसेंबरला रत्नागिरी-नागपूर महामार्ग अंकली (ता. मिरज) येथे रास्ता रोको आंदोलनाचा निर्णय झाला आहे. शनिवारी (ता. ७) येथील कष्टकऱ्यांची दौलत सभागृहात बैठक झाली. आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात आली.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तिपीठ महामार्गास सांगली जिल्ह्यापर्यंत समर्थन आहे, असे जाहीर केले होते. जिथे विरोध आहे तिथे महामार्गाच्या दिशेत बदल केला जाईल किंवा ते धार्मिक स्थळ नजीकच्या महामार्गास जोडण्यात येईल. शेतकऱ्यांना डावलून, त्यांची नाराजी घेऊन शक्तिपीठ महामार्ग होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच त्याचे पडसाद सांगली जिल्ह्यात उमटले होते.

प्रमुख गावातील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत शनिवारी बैठक झाली. प्रारंभी किसान सभेचे अध्यक्ष उमेश देशमुख यांनी आजपर्यंतच्या आंदोलनाचा, पाठपुराव्याचा आढावा घेतला. त्यानंतर शेतकऱ्यांनी या प्रश्‍नी आपली भूमिका मांडली.

गावागावांत जाऊन सरकारचे कारस्थान सांगितले. पाहिजे, अशी सूचना या वेळी करण्यात आली. शेवटी रास्ता रोको आंदोलन निर्णय झाला. या वेळी सतीश साखळकर यांनी आंदोलनास प्रत्येक गावातून अधिकाधिक महामार्ग बाधितांना घेऊन आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

महेश खराडे यांनी पुढील काळात ‘स्वाभिमानी स्टाइल’ आंदोलन करण्याचे आवाहन केले. या बैठकीस प्रभाकर तोडकर, सुनील पवार, उमेश एडके, विष्णू पाटील, यशवंत हारुगडे, प्रवीण पाटील आदी शेतकरी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Update: माॅन्सून गोव्यात दाखल; माॅन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक हवामान

Agriculture Workshop: सघन कापूस लागवडीवर केळीवेळी येथे मार्गदर्शन

Jalyukt Shivar Abhiyan: 'एल निनो'चं संकट; 'जलयुक्त शिवार'साठी १७० कोटी निधी, प्रत्येक जिल्ह्याला मिळणार ५ कोटी

Fertilizer Shop License Suspension: अकोला जिल्ह्यात सात कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द

Fertilizer Complaints Helpline: खतविषयक तक्रार निवारणासाठी तालुकानिहाय हेल्पलाइन सुविधा

SCROLL FOR NEXT