Sangli Sugarcane Rate agrowon
ॲग्रो विशेष

Sangli Sugarcane Rate : सांगली जिल्ह्यात ऊस दराचा प्रश्न चिघळणार, राजू शेट्टींचा जयंत पाटलांवर गंभीर आरोप

Sugarcane Rate Issue : सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्यातील बोलणी फिस्कटल्याने ऊस दराचा प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे.

sandeep Shirguppe

Sugarcane Rate Sangli : कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी फुटल्यानंतर सांगली जिल्ह्याचाही तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात होती परंतु सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्यातील बोलणी फिस्कटल्याने ऊस दराचा प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे. याबाबत माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषद घेत इशारा दिला आहे.

सांगली जिल्हा ऊसदराच्या फॉर्म्युल्यामुळे जिल्ह्यातील ऊस उत्पादकांचे ११० कोटींचे नुकसान होणार आहे. जिल्ह्यातील सर्वांत मोठे लाभधारक असणाऱ्या राजारामबापू कारखान्याच्या साखराळे आणि सर्वोदय या शाखांसाठीच हा फॉर्म्युला तयार केल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत केला.

दरम्यान, याला विरोध म्हणून शुक्रवारी (ता. १) सकाळी १० वाजता ऊस उत्पादक राजारामबापू कारखान्याच्या प्रवेशद्वारात ठिय्या मारतील. हा फॉर्म्युला बदलल्याशिवाय एकही शेतकरी उठणार नाही, असा इशारा दिला आहे. येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ते म्हणाले, 'कोल्हापूर जिल्ह्यात ऊसदर फॉर्म्युला हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हा प्रशासन, सहकार खाते यांच्यात झालेल्या चर्चेअंती मान्य केला. ज्या कारखान्यांनी गत हंगामात ३ हजार रुपयांपर्यंत दिलेत त्यांनी १०० रुपये द्यायचे. ज्यांनी 3 हजारपेक्षा जास्त दिलेत त्यांनी ५० रुपये द्यायचे. यावर्षी जी एफआरपी बसेल त्यापेक्षा १०० रुपये जास्त देण्याचे ठरले आहे.

सांगली जिल्ह्यातील कारखान्यांचा उतारा कोल्हापूरपेक्षा जास्त आहे, मात्र हा उतारा कमी असल्याचे सांगत आहेत. सांगलीतील फॉर्म्युल्यामुळे ऊस उत्पादकांचे ११० कोटींचे नुकसान होणार आहे. काही लोकांना फायदा होईल, असा फॉर्म्युला आहे. तो मान्य नाही. ऊसदराचा निर्णय होईपर्यंत ऊस घालवण्याची घाई करू नये. "

कोल्हापूर फॉर्म्युल्यानुसार एफआरपी अधिक १०० रुपयांनुसार चालू हंगामात सांगली जिल्ह्यातील कारखान्यांची तुटीची रक्कम ९६ कोटी ४७ लाख आहे. यात एकट्या 'राजारामबापू'ची ३६ कोटी २० लाख रक्कम आहे. यावरून खरा लाभधारक कोण आहे, हे स्पष्ट आहे. जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांच्या दबावाखालीच हा फॉर्म्युला ठरल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Desi Cow Conservation: स्थानिक गोवंशाच्या संवर्धनासाठी डोळस प्रयत्न आवश्यक

Kolhapur Jilha Bank: परराज्यांतील म्हैस खरेदीसाठी ‘केडीसीसी’कडून ३ लाखांपर्यंत कर्ज, धवलक्रांती योजना सुरु

Animal Vaccination: वेळापत्रकानुसार जनावरांमधील लसीकरण

Animal Care: जनावरातील शस्त्रक्रियेबाबत समज : गैरसमज

Agriculture Success Story: एकी हेच कोसले कुटुंबाचे धन

SCROLL FOR NEXT