Rain Alert Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Rain Alert: राज्यात उद्यापासून वाढणार पावसाचा जोर

Monsoon Forecast: कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम असला, तरी राज्याच्या अनेक भागात पावसाची उघडीप आहे. आज (ता. ४) कोकण, घाटमाथ्यासह पावसाचा जोर राहणार असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे.

अमोल कुटे

Pune News: कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम असला, तरी राज्याच्या अनेक भागात पावसाची उघडीप आहे. आज (ता. ४) कोकण, घाटमाथ्यासह पावसाचा जोर राहणार असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात हलक्या सरींची शक्यता असून, उद्यापासून (ता. ५) राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा त्याच्या सर्वसाधारण स्थितीपासून दक्षिणेकडे सरकला असून, जैसलमेरपासून कोटा, गुणा, सतना, दाल्तोंगंज, दिघा ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. ओडिशा आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. नैर्ऋत्य राजस्थानपासून वायव्य बंगालच्या उपसागरापर्यंत आणखी एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक किनारपट्टीला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम असल्याने मुसळधार पाऊस होत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. गुरुवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये तम्हीणी येथे सर्वाधिक २६० मिलिमीटर, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे २२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली. उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिपीसह हलक्या पावसाचा शिडकावा होत आहे. गुरुवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला आणि परभणी कृषी विद्यापीठ येथे राज्यातील उच्चांकी ३३.१ अंश तापमानाची नोंद झाली.

आज (ता. ४) रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता आहे. उद्यापासून (ता. ५) राज्याच्या विविध भागांत पाऊस जोर धरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

गुरुवारी (ता. ३) सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

‎पुणे---२६.७---२१.९

अहिल्यानगर---२८.१---२२.३

‎‎धुळे---३२.०---२१.०

जळगाव---३०.८---२३.८

जेऊर---३०.५---२०.०

‎‎कोल्हापूर---२५.९---२१.७

‎महाबळेश्‍वर---१९.३---१७.८

मालेगाव---३०.०---२२.६

‎‎नाशिक---२७.९---२२.६

‎निफाड---२९.०---२१.८

‎सांगली---२८.२---२२.३

‎सातारा---२६.३---२२.०

‎सोलापूर---३०.०---२४.२

‎सांताक्रूझ---२९.७---२५.४

डहाणू---३१.३---२५.१

‎रत्नागिरी---२९.६---२३.७

‎छत्रपती संभाजीनगर---३०.२---२३.४

‎धाराशिव---२८.६---२१.०

‎परभणी---३०.९---२४.४

परभणी (कृषी)---३३.१---निरंक

‎‎अकोला---३३.१---२४.७

अमरावती---३१.४---२२.८

‎भंडारा---३०.०---२३.०‎‎

बुलडाणा---२९.०---२२.०

‎ब्रह्मपुरी---२७.७---२४.४

‎चंद्रपूर---३०.६---२४.४

‎गडचिरोली---२८.२---२३.६

‎गोंदिया---२७.६---२४.४

‎नागपूर---३०.२---२५.०

‎वर्धा---३२.०---२२.०

‎वाशीम---३०.६---२२.४

‎यवतमाळ---२७.०---२३.२

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT