Rain Update Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांतील १९५ पैकी १०६ मंडलांत पावसाची हजेरी

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : मोसमी पावसाला सुरुवात झाली असली, तरी मराठवाड्यातील अनेक मंडलांतील गावांमध्ये अजूनही पावसाची समसमान हजेरी नसल्याची स्थिती आहे. शनिवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांत छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांतील १९५ पैकी १०६ मंडलांत पावसाची तुरळक, हलकी, तर काही ठिकाणी मध्यम हजेरी लागली.

बहुतांश मंडलांतील पाऊस हा तुरळक, हलक्या स्वरूपाचाच राहिला. जालना जिल्ह्यातील ४९ पैकी २७ मंडलांत पाऊस झाला. त्यापैकी १९ मंडलांतील पावसाची हजेरी दखलपात्र राहिली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ८३ पैकी ३१ मंडलांत पाऊस झाला. त्यापैकी केवळ दहा मंडलांतील पाऊस दखलपात्र राहिला.

बीड जिल्ह्यातील एकूण ६३ पैकी ४८ मंडलांत हजेरी लावणारा पाऊस २७ मंडलांत दखलपात्र स्वरूपात पडला. पावसाचे समसमान किंवा आवश्यकतेनुरूप न पडणे, पेरणी केलेल्या व पीक उगवून आलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढवते आहे. मंडलावर पडलेला पाऊस दिसत असला, तरी त्या मंडलातील अनेक गावांमध्ये अजूनही पावसाने खंडच दिल्याची स्थिती आहे.

दहा अकरा दिवस पाऊस नसताना पुन्हा अडीच ते तीन मिलिमीटर पाऊस पडणे म्हणजे पिकांसाठी तो पोषकच ठरत नसल्याची स्थिती आहे.

जिल्हानिहाय पावसाची दखलपात्र मंडळ (पाऊस मिलिमीटर मध्ये)

छत्रपती संभाजीनगर जिल्हा ः

वडोद बाजार २.५, जरंडी ६.३, बनोटी ४.३, सावलदबारा ९.३, सोयगाव ४, शिवना ६.८, चिखलठाणा ४.५, पाचोड ७.५, कचनेर ७.८, सिल्लोड ६.

जालना जिल्हा ः

भोकरदन ४.३, धनगरपिंपरी ३.५, बावणे पांगरी ६.३, जाफराबाद १२.८, कुंभारझरी ६.३, वरुड बु. ४.८, जालना शहर १६.३, शेवली ३२.३, विरेगाव ४४.८, रामनगर १४.५, पाचणवडगाव ३२, परतुर १४, वाटूर २१.३, श्रीष्टी ११, शेलगाव ३१, रांजणी ४४, तळणी ८.३, ढोकसाळ २६, पांगरी गोसावी २२.३.

बीड जिल्हा ः

बीड ११.३, पाली २४, राजुरी नवगण २.८, म्हालसाजवळा ७.८, नाळवंडी ६, पिंपळनेर ४.५, पेंडगाव ३.८, मांजरसुंबा ५, दासखेड ३.३, मादळमोही १७.८, पाचेगाव १३.८, जातेगाव २.५, सिरसदेवी ६.३, तालखेड ७.३, पाटोदा ३.३, लोखंडी सावरगाव ४.३, बर्दापूर १०.५, केज २२.८, यूसूफ वडगाव ५.८, होळ १९.५, विडा २९.३, बनसारोळा १८.३, धारूर ८, मोहखेड ८.३, कौडगाव ७.३, शिरूर कासार १३, रायमोहा १७.८.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Soybean Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना मिळाले ९६ कोटींचे अर्थसाह्य

Soybean Cotton Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना २६५ कोटींवर अर्थसाह्य देय

MSP Procurement : ‘पणन’कडून तेरा ठिकाणी शासकीय खरेदी केंद्रे सुरू होणार

Fruit Crop Insurance : आंबा, काजू उत्पादकांना तातडीने विमा मिळावा

Soybean Cotton Subsidy : लातूरला १५१, तर धाराशिवला १४१ कोटींचे वाटप

SCROLL FOR NEXT