Rain Alert Konkan agrowon
ॲग्रो विशेष

Rain Alert Konkan : कोकणात वादळी वाऱ्यासह पाऊस; आंबा, काजू पिकाचे नुकसान, २ दिवस पावसाचा इशारा

Mango Crop Damage Rain : कोकणात गारपिटांसह पाऊस झाल्याने आंबा आणि काजू पिकांचे मोठे नुकसान झाले. रविवार(ता.२३) सायंकाळी जिल्ह्यातील अनेक गावांत वादळी वाऱ्यासह गारपीट झाली.

sandeep Shirguppe

Sindhudurg Rain Alert : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी अचानक वादळी वाऱ्यासह गारपिटांचा पाऊस झाला. सकाळी अचानक धुके दुपारी प्रचंड उकाडा सायंकाळी गारपिटांसह पाऊस झाल्याने आंबा आणि काजू पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. रविवार(ता.२३) सायंकाळी जिल्ह्यातील अनेक गावांत वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. सध्या उष्ण आणि दमट वातावरण असल्याने सोमवार (ता.२४) आणि मंगळवारी(ता.२५) हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मागच्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने प्रचंड उकाडा जाणवू लागला होता. दरम्यान, रविवार (ता.२३) दुपारी तीन-चार वाजल्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचे वातावरण निर्माण होण्यास सुरूवात झाली. काही भागांत हलकासा गडगडाट झाला. त्यानंतर वादळीवाऱ्यासह जोरदार पावसाला सुरूवात झाली. आंबा पिकास धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दोडामार्ग तालुक्यातील घोटगेवाडी, सासोली, झोळंबे, कोलझर, कळणे, उगाडे, कुडासे, मणेरी, भेडशी, साटेलो, परमे, खोक्रल, सोनावल, तेरवण, मेढे या परिसराला वादळीवाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. तर कुडासे परिसरात जोरदार गारपिटीचा तडाखा बसला. ऐन उन्हाळ्यात रस्त्यावरून पाणी वाहत होते. वादळामुळे या भागातील वीजपुरवठा खंडित झाला. सायंकाळी उशिरापर्यंत या भागात पावसाच्या सरी बरसत होत्या.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतर भागातही पावसाचे वातावरण आहे. वैभववाडी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी भागात हलक्या सरी कोसळल्या आजही पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. दोडामार्ग तालुक्यात झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीने काजू पिकांचे मोठे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू हंगाम सुरू आहे. काजूचा नव्याने आलेला मोहोर गळून पडला आहे. ज्या गावांमध्ये गारपीट झाली आहे. त्या गावांमध्ये सर्वाधिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT