Panwel News : पनवेल तालुक्यातील ७० ते ८० टक्के भात पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. शेतातील खरीपपूर्व मशागतीची कामेदेखील उरकलेली आहेत; मात्र अर्धे मृग नक्षत्र उलटूनही पाऊस पडला नसल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.
पनवेल तालुक्यातील शेतीचे प्रमाण कमी झाले आहे. गेल्या वर्षी ८,२६४ हेक्टरवर भातशेती लागवड झाली होती.
यंदाही ८ हजार हेक्टरच्या आसपास लागवड होणार असल्याचा अंदाज आहे. अशातच गेल्या काही वर्षांपासून अवकाळी तसेच अतिवृष्टीमुळे पिकांची हानी झाली आहे. अशातच यंदा समाधानकारक पाऊस होईल अशी आशा बाळगून शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत.
अनेक भागांत पावसाच्या शिडकाव्यानंतर जवळपास ८० टक्के शेतकऱ्यांनी भात पेरणी केली आहे; मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे.
खते खरेदीकडे पाठ
गेल्या वर्षी खरीप हंगामात उत्पन्न मिळू शकले नाही. तरीही काही जणांनी कसेबसे पीक घेतले. अशातच अर्धे मृग नक्षत्र उलटूनही पाऊस झाला नसल्याने शेतकरी चिंतातुर आहे. बहुतांश वेळा मृग नक्षत्र निघताच अवकाळी पावसाला सुरुवात होते.
कृषी दुकानदारांनी खते विक्रीसाठी दुकानात आणून ठेवली आहेत; मात्र पावसाचा पत्ताच नसल्याने शेतकऱ्यांनी खते खरेदीकडे पाठ फिरवली आहे.
पनवेलमधील नगण्य शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे. सिंचनाने भात रोपे वाढवणार आहेत, त्यामुळे ठरावीक शेतकऱ्यांची भातशेती फुलणार आहे. असे असले तरी पावसाच्या पाण्यावर येणाऱ्या पिकाला सिंचनाने घेतलेल्या पिकाची सर कधीच येत नाही.तानाजी दोलताडे, कृषी अधिकारी, पनवेल
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.