Pune News : कोकण, मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात दमदार कोसळल्यानंतर आता पावसाचा जोर कमी झाला आहे. पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला. रविवारी (ता. २२) सकाळी आठ वाजेपर्यंत पालघरमधील तलासरी येथे सर्वाधिक १०६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कमी झालेल्या पावसामुळे धरणांतील आवक काही मंदावली आहे. पावसाने उघडीप दिल्यास शेतीकामांना वेग येणार आहे.
गेल्या आठवड्यात कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडला. त्यानंतर पावसाचा प्रभाव कमी झाला आहे. अजूनही कोयना, ताम्हिणी, शिरगाव या घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे. कोयना घाटमाथ्यावर सर्वाधिक १०२ मिलिमीटर पाऊस झाला. इतर घाटमाथ्यावर हलका ते मध्यम सरी बरसल्या. तर कोकणातील पालघरमधील झरी मंडलात ८९ मिलिमीटर पाऊस झाला. तर चंद्रपूरातील ब्रम्हवती मंडलात ६७ मिलिमीटर पाऊस झाला.
पुणे जिल्ह्यात गेले दोन दिवस पावसाचा जोर कमी झाला आहे. धरणक्षेत्रात आणि घाटमाथ्यावर अजूनही अधूनमधून हलका ते मध्यम पाऊस कोसळत आहे. जिल्ह्यातील धरणांत मागील चोवीस तासांमध्ये ७.१३ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे. आतापर्यंत पाच धरणांत पाणीसाठा ७५ टक्केहून अधिक झाला असल्याने विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली आहे.
मुळशी धरणक्षेत्रात सर्वाधिक ८० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. तर कुंडली घाटमाथ्यावर २५, वळवण २४, लोणावळा १७, ठोकरवाडी १६, शिरोटा १० मिलिमीटर पाऊस पडला. तर टेमघर धरणक्षेत्रात ४० वसरगाव १४, पवना २१, कासारसाई १२, वडीवळे २४, गुंजवणी २४, नीरा देवगर येथे २० मिलिमीटर पाऊस झाला.
तर उर्वरित धरण क्षेत्रात पावसाची उघडीप असली तरी काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. परंतु आतापर्यंत झालेल्या पावसामुळे धरणात अजूनही पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणात ९३.०३ टीएमसी म्हणजेच ४६ टक्के पाणीसाठा झाला आहे. नाशिक, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांतही पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. परंतु आतापर्यंत झालेल्या पावसामुळे धरणात अजूनही आवक सुरू आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.