Monsoon Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Pune Rain : पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरण्यास सुरुवात

Pune Rain Update : मागील चार ते पाच दिवसांपासून राज्यात अनेक भागांत दमदार पाऊस पडल्यानंतर आता जोर ओसरण्यास सुरुवात झाली आहे.

Team Agrowon

Pune News : मागील चार ते पाच दिवसांपासून राज्यात अनेक भागांत दमदार पाऊस पडल्यानंतर आता जोर ओसरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र कोकणात अजूनही काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे.

तर घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस पडत आहे. मंगळवारी (ता. २७) सकाळी आठ वाजेपर्यंत ताम्हिणी घाटमाथ्यावर सर्वाधिक १९० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. या पावसामुळे धरणांत अजूनही येवा सुरूच आहे.

कोकणात मागील तीन ते चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे भात खाचरे भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी सततच्या पावसामुळे भात पिकांचे नुकसान होऊ लागले आहे.

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर जिल्ह्यांत अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला असून, काही ठिकाणी हलक्या सरी बरसल्या. रत्नागिरीत काही ठिकाणी अतिवृष्टीसदृश पाऊस झाला. तर ठाणे जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे.

मात्र देहरी येथे ७८ मिलिमीटर, तर नयाहडी ५५ मिलिमीटर पाऊस पडला. परंतु सततच्या पावसामुळे कोकणातील नद्या अजूनही दुथडी भरून वाहत असल्याने धरणांतून विसर्ग सोडण्यात आला आहे.

घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढला आहे. जवळपास आठ घाटमाथ्यांवर मुसळधार पाऊस पडला आहे. त्यामुळे कोकणातील धबधबे ओसंडून वाहत आहेत. नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या पश्चिम भागात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. पूर्व भागात पावसाची उघडीप असली, तरी अधूनमधून शिडकावा होत होता. नगरमधील साकीरवाडी येथे ५२ मिलिमीटर पाऊस झाला. तर नंदुरबारमधील नवापूर येथे ३८ मिलिमीटर, तर नवागाव, चिंचपाडा, विसरवाडी, खांडबारा ३२ मिलिमीटर पाऊस झाला. मराठवाडा व विदर्भातही पावसाचा जोर चांगलाच ओसरला आहे. अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून तुरळक सरी पडत आहेत.

पाऊस दृष्टिक्षेपात...

कोकणात पावसाचा मध्यम ते जोरदार पाऊस.

खानदेशात हलक्या ते मध्यम सरी, मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस, पूर्व भागात तुरळक सरी.

विदर्भ, मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या सरी.

या घाटमाथ्यावर पडला सर्वाधिक पाऊस

घाटमाथा पडलेला पाऊस, मिमी

या घाटमाथ्यावर पडला सर्वाधिक पाऊस

घाटमाथा पडलेला पाऊस, मिमी

ताम्हिणी १९०

दावडी १८४

शिरगाव १६८

कोयना १५२

भिवपुरी १३३

धारावी १२८

डुंगरवाडी १२५

लोणावळा १०६

येथे पडला १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस (मिलिमीटरमध्ये) : माले, मुठे १३६, महाबळेश्‍वर १३०, कार्ला ११८, पानशेत ११०, भोलावडे, वेल्हा १०३, बिरवडी, १०३, भेडशी १०१.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Farmer Training: पवारवाडीत महिलांना शेतीविषयक धडे

Farmers Protest: ऊस बिलासाठी म्हेत्रेंच्या घरासमोर बेमुदत उपोषण सुरू

Ahilyanagar Zilla Parishad: अहिल्यानगरला ३८ महिलांना मिळणार जिल्हा परिषदेत संधी

Solapur Zilla Parishad: विजय डोंगरे, उमेश पाटलांना संधी, साठेंची अडचण वाढली

Crop Protection: कीड-रोगावर नियंत्रणासाठी पीक निरीक्षणाची गरज 

SCROLL FOR NEXT