Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : काढणीला आलेल्या मुगाचे पावसाने नुकसान

Moong Crop : पावसाचे लवकर आगमन झाल्यामुळे मुगाची पेरणी लवकर उरकली. आता बहुतांश भागात मूग काढणीला आला आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : पावसाचे लवकर आगमन झाल्यामुळे मुगाची पेरणी लवकर उरकली. आता बहुतांश भागात मूग काढणीला आला आहे. मात्र गेल्या चार-पाच दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरू असल्यामुळे मुगाचे नुकसान होत आहे.

शेंगा तोडणीची लगबग सुरू असली तरी पावसामुळे शेंगातच कोंब फुटण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकरी चिंता व्यक्त करीत आहेत. शेतकऱ्यांकडून मिळलेल्या माहितीनुसार पंचवीस ते तीस टक्के आतापर्यंत नुकसान झाले आहे.

राज्यात मुगाचे सरासरी ३ लाख ९३ हजार ९५७ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यंदा आतापर्यंत २ लाख ३२ हजार ४४२ हेक्टरवर मुगाची पेरणी झाली आहे. सर्वाधिक नगर जिल्ह्यात ५० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर मुगाची पेरणी झालेली आहे.

त्यापाठोपाठ नाशिक, जळगाव, पुणे, सोलापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड जिल्ह्यांत मुगाचे क्षेत्र बऱ्यापैकी असते. मृगात लवकर पाऊस झाला तर मुगाची अधिक पेरणी होते. अलीकडच्या काही वर्षांत मुगाचे क्षेत्र घटत आहे. राज्यात गेल्या वर्षीपेक्षा यंदा सुमारे सत्तर हजार हेक्टरवर अधिक पेरणी झाली आहे.

आमच्याकडे चार एकर मूग होता. यंदा मुगाची परिस्थिती चांगली होती. मात्र आता काढणीला आलेला असताना आठवडाभरापासून सातत्याने पाऊस येत असल्याने शेंगा तोडता आल्या नाहीत. आता मुगाला शेंगातच कोंब फुटले आहेत. त्यामुळे आर्थिक फटका बसणार आहे. शासनाने पंचनामे करुन नुकसानभरपाई दिली पाहिजे.
- बाळासाहेब मोहारे, मूग उत्पादक शेतकरी, कारेगाव ता. श्रीगोंदा, जि. नगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Price Issue: कापसाचे दर पडण्यास शासन जबाबदार

Banana Price: गुणवत्ता निकषावर मालाला मिळणार दर

Agriculture Technology: नव्या तंत्रज्ञानामुळे देशात कृषी क्षेत्रात क्रांती

Global Sugar Production: जागतिक बाजारात साखर पुरवठा वाढणार

Monsoon Heavy Rain: घाटमाथ्यावर जोरदार सरी

SCROLL FOR NEXT