Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Rainfall: कोल्हापुरात पाऊस सुरूच, पाच बंधारे पाण्याखाली

Rain Alert: कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडझाप सुरूच आहे. सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत ठिकठिकाणी पाऊस सुरूच होता.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडझाप सुरूच आहे. सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत ठिकठिकाणी पाऊस सुरूच होता. सोमवारी दुपारी बारापर्यंत राजाराम बंधाऱ्याची पातळी १७.७ फूट इतकी होती. अद्याप राजाराम बंधाऱ्यासह रुई, इचलकरंजी, यवलूज, शिरोळ हे बंधारे पाण्याखालीच आहेत.

पावसाने उघडीप दिल्याने रविवारी (ता. २५) पंचगंगेच्या पाणी पातळीत दिवसभरात पाच इंचांनी घट झाली.रात्री राजाराम बंधारा येथे पाणी पातळी १७ फूट चार इंचांवर राहिली. अद्याप या बंधाऱ्यावर पाणी असल्याने येथील वाहतूक बंदच ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यात दिवसभरात काही काळ पावसाची उघडीप राहिली.

अद्याप शेतात पाणी असल्याने काढणीला आलेली पिके खराब होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.तर पाऊस न थांबल्याने पेरणी कशी करायची, हा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर आहे. अजूनही पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा इशारा दिल्याने शेतकऱ्यात चिंतेचे वातावरण कायम आहे.

मॉन्सूनपूर्व पावसामुळे कापणीस आलेली उन्हाळी पिके कुजू लागली आहेत. त्यामुळे बळीराजाच्या चेहऱ्यावर चिंतेचे ढग दाटू लागले आहेत. उन्हाळी सूर्यफूल, भुईमूग, नाचणा, मका, भात आदी पिकांस फटका बसला आहे. तसेच मागील दहा-बारा दिवसांपासून पावसाची रिपरिप असल्यामुळे शेतात असणारी हातातोंडाशी आलेली पिके काढण्याच्या चिंतेत शेतकरी आहेत.

मॉन्सूनपूर्व मशागतीची कामे खोळंबली आहेत. कापणीयोग्य उन्हाळी भात पिकास फटका आहे. भातमळणी केलेल्या शेतकऱ्यांचे पिंजर भिजले असून सततच्या पावसामुळे ते कुजले आहेत. परिपक्व भूईमूग, सूर्यफूल, मक्याला अंकुर येण्यास सुरुवात झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार ; टोमॅटो दर टिकून, केळीला मागणी, आल्याला उठाव तर गवारची आवक टिकून

Sugarcane FRP Dues: थकीत 'एफआरपी'प्रश्नी ८१ साखर कारखान्यांना नोटिसा, सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांची विधानपरिषदेत माहिती

Cotton Productivity Mission: कापूस उत्पादकता अभियान फसण्याचे संकेत

Rain Update In Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज 

Crop Insurance: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेना; कृषिमंत्र्यांची कबुली

SCROLL FOR NEXT