Mango Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Raigad Horticultural Area : बागायती क्षेत्र ६९ हजार हेक्‍टरवर रायगड जिल्ह्यातील स्थिती; भातशेतीऐवजी फळझाडांना पसंती

Raigad Agriculture : पारंपरिक भातशेती परवडत नसल्याने रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी फळझाडे लागवडीकडे लक्ष केंद्रित केले आहे. यामुळे २५ ते ३० वर्षांपूर्वी फक्त किनारपट्टीवरील भागात मर्यादित असलेले फळझाड क्षेत्र विस्तारले जात आहे.

Team Agrowon

Raigad News : अलिबाग : पारंपरिक भातशेती परवडत नसल्याने रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी फळझाडे लागवडीकडे लक्ष केंद्रित केले आहे. यामुळे २५ ते ३० वर्षांपूर्वी फक्त किनारपट्टीवरील भागात मर्यादित असलेले फळझाड क्षेत्र विस्तारले जात आहे. डोंगरमाथ्यावरील फळझाडे लागवडीबरोबर आता भातशेती आणि माळरानावरही आंबा, काजू, चिकू यांसारख्या फळपिकांच्या बागा बहरू लागल्या आहेत.

सध्या फळझाडे लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. जागेचे सपाटीकरण करणे, तेथे कुंपण घालणे आणि खड्डे खोदण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यात आजघडीला ६९ हजार हेक्टर क्षेत्र बागायतीखाली आहे. त्यात दरवर्षी साधारण चार ते पाच हजार हेक्टरची वाढ होत आहे. यावरून शेतकऱ्यांनी फळझाडे लागवडीची कास धरल्याचे दिसत आहे.

पावसाची अनियमितता, सिंचनासाठी पाण्याची कमतरता, जमिनीचा खालावलेला दर्जा यावर फळझाडे लागवड किफायतशीर ठरत आहे. सरकारने प्रोत्साहनपर योजना सुरू केल्याने जिल्ह्यात  बागायतीचे एकूण क्षेत्र ६९ हजार हेक्टरपर्यंत गेले आहे. ते खरीप हंगामातील एकूण लागवडक्षम क्षेत्राच्या ६० टक्के आहे.

विमा काढण्याचा प्रयत्न जास्त
रायगड जिल्ह्यात भातशेतीपेक्षा फळबागायतीसाठी विमा काढण्याचा प्रयत्न जास्त आहे. फळझाडांचे नुकसान झाले तर केवळ एक रुपयात विमा काढता येत असल्याने फळझाडे बागायतदारांना हमखास सुरक्षाकवच मिळाले आहे. जास्तीत जास्त नफा मिळविण्यावर येथील शेतकऱ्यांचा भर आहे; मात्र असे न करता शेतकऱ्यांनी रासायनिक कीटकनाशके, खते, संप्रेरके यांचा वापर टाळला पाहिजे. यंदा रायगड जिल्ह्यात शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीची माहिती दिली जात असल्याचे कृषी अधीक्षक वंदना शिंदे यांनी सांगितले.

भातशेती परवडत नव्हती. उन्हाळ्यात पाणी नसल्याने एकाच पिकावर समाधान मानावे लागत होते. सरकारी योजनेतून पहिल्यांदा वरकस जमिनीवर लावलेली आंब्याची २८ झाडे चांगली जगली आहेत. १० वर्षांनंतर यातून फायदा मिळू लागल्याने दोन एकर भातशेतीमध्येही ८० झाडे लावली आहेत. ज्या जमिनीतून काहीच फायदा मिळत नव्हता त्यातून उत्पन्नाचे साधन निर्माण झाले आहे.
- तुकाराम गावंड, आंबा बागायतदार, अलिबाग
फळझाडांचे प्रमाण वाढत आहे त्या प्रमाणात फळपिकांवर प्रक्रिया करणारे उद्योगही वाढले पाहिजेत. रायगडमध्ये तयार होणाऱ्या हापूसला एक वेगळी चव आहे, याचे ब्रँडिंग होणे आवश्यक आहे. येथे पिकणाऱ्या फळाच्या विक्रीसाठी विक्री केंद्र उभारण्याचा आमचा प्रयत्न असणार  आहे.  सरकारकडून रोजगार हमी योजनेशी निगडित फलोत्पादन कार्यक्रम राबवण्यावर भर दिला जात आहे.
- महेंद्र दळवी, आमदार

फळझाड लागवडीखालील क्षेत्र हेक्‍टरमध्ये

लागवडक्षम  
१ लाख ४१ हजार
भातपिकाखालील
१ लाख ०४ हजार
फळझाडे
६९ हजार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parbhani Cooperative Fraud: परभणीच्या तब्बल ४२ संस्थांची नोंदणी रद्द

ICAR Farmer Awards: ‘आयसीएआर’च्या कृषी पुरस्कारात गृहमंत्रालयाचा खोडा

Farmer Protest: कृषी वायदे बाजार मुक्तीसाठी शेतकरी संघटना करणार आंदोलन

Admission Criteria: कृषी पदवी अभ्यासक्रमासाठी गुणांची अट शिथिल

Lumpy Disease: मोकाट जनावरांमुळे फैलावतोय ‘लम्पी’ आजार  

SCROLL FOR NEXT