Adivasi People Maharashtra : "आदिवासी लोक या देशाचे पहिले मालक आहेत. परंतु भाजपवाल्यांकडून तुम्हाला वनवासाची उपमा दिली जात आहे. वनवासी म्हणजे जल, जमीन आणि जंगलावर अधिकार नसणारे असे त्याचा अर्थ होतो. जमीन अधिग्रहण बिल, पेसा कायदा कुणी आणला होता, हे बघितलं पाहिजे. या बिलांमुळे जंगल, जमीन, शेतीचा आणि पाण्याचा अधिकार आदिवासींना दिला. आम्ही आदिवासींना आधार देण्याचं काम केलं. परंतु भाजपचं सरकार येताच तुमचे अधिकार हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे राहुल गांधी म्हणाले. गुरूवारी (ता.१४) नंदुरबार येथील सभेत राहुल गांधी यांनी आदिवासींना संबोधित केलं.
राहुल गांधी पुढे म्हणाले की, पुढच्या दहा-पंधरा वर्षांमध्ये जंगल उरणार नाही. त्यामुळे जंगलातून तुम्हाला बाहेर जावं लागेल. देशामध्ये ८ टक्के आदिवासींची संख्या आहे. शंभरापैकी ८ लोक आदिवासी आहेत. मग आठ लोकांना त्यांचा वाटा मिळतो का? ९० ऑफिसर देशाचं सरकार चालवतात. सरकार १०० रुपये खर्च करीत असेल १० रूपये अधिकाऱ्यांच्या खिशात जात असतात आणि आदिवासींच्या वाट्याला काय राहतं हे तुम्हीचं बघा असे गांधी म्हणाले.
गांधी पुढे म्हणाले की, "९० पैकी केवळ एक आदिवासी अधिकारी या भारतात काम करत असल्याचे चित्र आहे. त्या अधिकाऱ्याच्या हातात काहीही नाही. त्याला मागे खेचलं जातं, जबाबदाऱ्या दिल्या जात नाहीत. एवढंच नाही तर मोठमोठ्या कंपन्या, मीडिया हाऊसेसमध्ये, उद्योग, व्यवसायामध्ये आदिवासींना संधी मिळत नाही.''
राहुल गांधी म्हणाले की, आदिवासींना संधी मिळाव्यात यासाठी मी काम करणार आहे. महाराष्ट्रात आमचं सरकार आलं तर आदिवासींचं कर्ज माफ करणार आहे. महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये टाकण्यात येणार आहे. याशिवाय बसही मोफत दिली जाईल. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीच्या पाठीशी तुम्ही राहिलं पाहिजे असे मत राहुल गांधी यांनी व्यक्त केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.