New Delhi News: लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मतचोरी झाल्याची टीका लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी करत निवडणूक आयोगावर अनेकदा टीका केली होती. तसेच ‘‘आमच्याकडे पुरावे असून ते पुराव्यानिशी सर्वांसमोर मांडू असेही सांगितले होते.’’ त्याबाबतचे सादरीकरण गुरुवारी गांधी करून महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी कशी झाली, हे दाखवून दिले.
दरम्यान, या वेळी निवडणूक आयोग आणि भाजपची मिलीभगत झाली होती का असा प्रश्न उपस्थित करत राहुल यांनी निवडणूक आयोग सीसीटीव्ही फुटेज, मतदार यादी नष्ट का करू इच्छितो, असाही प्रश्न उपस्थित केला. तसेच निवडणूक आयोग भारतीय लोकशाही नष्ट करत चालला आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
श्री. गांधी म्हणाले, की महाराष्ट्रातील निवडणुकीबाबत खूप संशय होता. पण लॉजिकल कारण कुणालाच सांगता येऊ शकत नव्हते. महाराष्ट्रात पाच महिन्यांत खूप मतदार वाढले. ते इतके वाढले की एकूण पाच वर्षांत तेवढे वाढले नव्हते. एकूण लोकसंख्येपेक्षाही जास्त मतदार दाखवले गेले. हे खूप संशयास्पद होते. लोकसभेत इंडिया आघाडीला खूप चांगले यश मिळाले. आणि त्यानंतर पाचच महिन्यात इंडिया आघाडीला अपयश मिळाले आणि भाजप सत्तेत आले.
त्यानंतर मी विविध वर्तमानपत्रांमध्ये लेख लिहिले. त्यात मी म्हटले होते की, महाराष्ट्रातील निवडणूक ही चोरली गेली होती. निवडणूक आयोगाने मतदार यादीच आम्हाला देण्यास नकार दिला. हे खूप संशयास्पद होते. आम्हाला मतदार यादीतील नावे अशी दिली गेली की त्याचे विश्लेषणच करता येऊ नये.
सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्यामागे हेतू काय?
श्री. गांधी म्हणाले, की निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे, की ते आता सीसीटीव्ही फुटेजही डिलीट करणार आहेत. याची काहीही गरज नसताना असा निर्णय कशासाठी? त्यामुळे संशय अधिक बळावतो. निवडणूक आयोग भाजपसोबत मिळून काम करतो आहे. त्यांनी मिळून ही निवडणूक चोरली. याचे पुरावे आमच्याकडे आहेत. इलेक्ट्रॉनिक डेटा देण्यास आयोगाने का नकार दिला ते आम्हाला कळाले. कारण आम्हाला कारण कळू नये, असे त्यांना वाटत होते. गेल्या सहा महिन्यांत आम्ही याचा अभ्यास केला. मतदार याद्यांमध्ये कसा घोळ केला हे लक्षात आले. त्यामुळेच आम्हाला डेटा देण्यास आयोगाने नकार दिला, असेही गांधी म्हणाले.
डुप्लिकेट मतदारांची लिस्ट...
राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत डुप्लिकेट मतदारांची यादीच दिली. खोटे पत्ते असलेल्या मतदारांचीही माहितीही त्यांनी दिली. अनेक मतदारांच्या पत्त्यामध्ये घरनंबर०, रस्त्याचा नंबर० असे पत्ते आहेत. अनेकांच्या वडिलांचे नावेही सारखीच असल्याचे दिसून आले. मुळात ते नावच अस्तित्वात नसलेले आहे. असे खोटे पत्ते असलेले ४० हजार मतदार सापडले आहेत. तसेच मतदार कार्डावरील अनेक पत्ते अस्तित्वातच नाहीत. ४००० मतदारांचे फोटोच नव्हते.
या वेळी गांधी यांनी शकुन राणी या नावाचे एक उदाहरण दिले. शकुन राणी या नावाने दोन वेगवेगळ्या मतदार केंद्रांवर दोन वेळा मतदान केले गेले. एकाच मतदारसंघात मतदान केले गेलेले असे ३३ हजारांवर मतदार दिसून आले आहेत. या नवमतदारांच्या वयावर लक्ष दिले तर अनेकांची वये ९० च्या पुढे दिसतात. ९० वयापुढील मतदार नवमतदार असतात का, असा प्रश्नही गांधी यांनी या वेळी विचारला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.