Rabi Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Sowing : रब्बीच्या उर्वरित पेरण्या होण्याच्या आशेवर पाणी

Rabi Season : या वर्षी अपुऱ्या पावसाने पिके वाया गेली असून, सततच्या या नापिकीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.

Team Agrowon

Dharashiv News : या वर्षी जेवळी परिसराला परतीच्या पावसाने हुलकावणी दिली आहे. आता चक्रीवादळाचा परिणाम म्हणून जिल्ह्यात ठिकठिकाणी चांगला पाऊस होत असताना पुन्हा जेवळी परिसराला पावसाने हुलकावणी दिल्याने रब्बीच्या उर्वरित पेरण्या होण्याची आशा आता मावळल्या आहेत.

यंदा जेवळी परिसरात पावसाअभावी अनेक फड पेरणीविना रिकामे राहिले असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. शेतकरी भविष्यातील चारा, पाणीटंचाईने चिंतेत झाले आहेत. गेल्या वर्षी अतिवृष्टी व रोगराईने पिके नष्ट झाली. या वर्षी अपुऱ्या पावसाने पिके वाया गेली असून, सततच्या या नापिकीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.

या वर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीला पावसाचे दीड महिना उशिरा आगमन झाले होते. तेही अपुरा प्रमाणात पाऊस झाल्याने उगवलेल्या पिकेची योग्य वाढ झाली नाही. पावसाची प्रदीर्घ खंड व अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगामात अनेक फडे पेरणीविना रिकामे राहिली होती. अपेक्षित उत्पन्न न निघाल्याने शेतकऱ्यांचे सर्व आशा आता रब्बी हंगामावर होती.

खरीप हंगामात रिकामा ठेवलेल्या फडात काही प्रमाणात पेरण्या उरकल्या. परंतु खरिपाची पेरणी लांबल्याने पुढे राशी व मशागतीत वेळ गेल्याने जमिनीतील ओलावा कमी होत गेला. तसेच परतीचा पावसाने दगा दिल्याने रब्बी पेरणीला मोठा अडथळा निर्माण झाला. पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी पाणी देऊन पेरणी उरकल्या. परंतु पुरेशा ओलाव्या अभावी रब्बी हंगामात अनेक फडे पेरणीविना रिकामे राहिले आहेत.

आमची बारा एकर शेती आहे. परंतु या वर्षी निसर्गाच्या अवकृपेने खरीप हंगामात चार एकर तर आता रब्बी हंगामात सहा एकर पेरणीविना राहिली आहे. यामुळे आर्थिक गणित विस्कटली असून पशुधन जगविण्याबरोबरच घर प्रपंच चालवायचा कसा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
- सचिन हावळे, शेतकरी, जेवळी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीच्या कारभाराची होणार चौकशी

Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही

White Grub Pest Management: हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन मोहीम

Central Government Policy: कांदा, साखर उद्योगांबाबत बुधवारपर्यंत केंद्र निर्णय घेईल : आमदार दिलीप वळसे पाटील

Soybean Oil Demand: अमेरिकेत जैवइंधनासाठी सोयातेलाचा वापर वाढता

SCROLL FOR NEXT